Bharat Jodo : पंतप्रधानांची नीती भारत तोडण्याची, तर आमची जोडण्याची..

पहिल्यांदाच कॉंग्रेस इतकी आक्रमक झाली आहे, हे पाहून भाजप घाबरली आहे. (Congress Leader Jayram Ramesh)
Bharat Jodo Rally In Maharashtra News, Nanded
Bharat Jodo Rally In Maharashtra News, NandedSarkarnama

नायगाव (जि. नांदेड) : खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत कॉंग्रेसचे समर्थक, टीकाकार आणि त्रयस्त देखील सहभागी होत आहेत. ही यात्रा मन कि बात नसून जन की बात आहे. पंतप्रधान यांची नियत आणि नीती भारत तोडण्याची आहे, त्याला आम्ही जोडण्याचे काम करत आहोत, अशी टीका माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी केली.

Bharat Jodo Rally In Maharashtra News, Nanded
Bharat Jodo : `भारत जोडो` मुळे काॅंग्रेस पक्षात युवकांचे महत्व वाढले, निर्णय प्रक्रियेतही सहभाग..

नायगाव येथे पत्रकार परिषदेत बुधवारी (ता. ९) ते बोलत होते. जयराम रमेश म्हणाले, "भारत तीन पातळ्यांवर तोडण्याचे काम सुरु आहे. (Congress) त्यात पहिले आर्थिक विषमता आहे. महागाई, बेरोजगारी आणि जीएसटीद्वारे ते साध्य करत आहेत. दुसरे भारताला कमजोर करण्यासाठी ध्रुवीकरणाचे राजकारण खेळले जात असून जाती, भाषेवर विभागणी केली जात आहे. (Rahul Gandhi) तिसरे म्हणजे, राजकीय तानाशाही सुरु आहे.

संवैधानिक संस्थांचे खच्चीकरण करुन सगळे अधिकार पंतप्रधान कार्यालयाकडे ठेवले आहेत." भारत जोडो यात्रेवर भाजपकडून रोज टीका होतेय. ट्विटर खाते बंद करण्याचे प्रयत्न झाले. पहिल्यांदाच कॉंग्रेस इतकी आक्रमक झाली आहे, हे पाहून भाजप घाबरली आहे. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विरोधात २०१२ साली दिल्लीत जंतरमंतरवर बसून आंदोलन करत रान उठवणारे आंदोलक आता आमच्या यात्रेसोबत आहेत.

महाविकास आघाडीत 'कॉमन मिनिमम प्रोग्राम' ठरला. त्यानुसार, शिवसेना-कॉंग्रेसमध्ये विचारसरणीत मध्यममार्ग काढण्यात आला होता. भाजप विरोधी पक्षांना सोबत घेत आहे. त्यातूनच शिवसेनेला आम्ही निमंत्रण दिले आहे, असेही ते म्हणाले. आमची यात्रा भारत जोडो आहे. चुनाव जितो नव्हे, असे स्पष्ट करताना जयराम रमेश म्हणाले, निवडणुकांत काय होईल माहित नाही, ते वेळ सांगेल. पण यामुळे संघटनेला संजीवनी मिळाली आहे. नवा उत्साह, नव्या जोशांसह कॉंग्रेस नव्याने उभी राहतेय, असा विश्वास वाटतो.

राहुल गांधी यांना लोकसभेत अध्यक्ष बोलू देत नाहीत. 'पार्लमेंटरी स्टँडीग कमिटी ऑफ डिफेन्स'चे ते सदस्य आहेत, तिथेही त्यांना बोलू दिले जात नाही, चीनवर तर, काहीच बोलायला परवानगी नसते, असा अनुभव देखील जयराम रमेश यांनी यावेळी सांगितला. भारत जोडो यात्रेतील राहुल गांधीची सहावी पत्रकार परिषद शेगावमध्ये होणार आहे. १७ नोव्हेंबरला दुपारी एक वाजता पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती जयराम रमेश यांनी दिली. पंतप्रधानांनी आठ वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही. राहुल गांधींनी ६२ दिवसाच्या दौऱ्यात पाच पत्रकार परिषदा घेतल्याचे सांगत तुलना केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com