Bharat Jodo Yatra : राहुल गांधींसाठी दही-धपाटे, वांग्याचे भरीत, भाकरी-पिठल्याचा मेन्यू

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेच्या प्रचार आणि प्रसारासाठी एक नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील वाडी, वस्ती, तांड्यावर आठ एलईडी डिजिटल व्हॅन फिरत आहेत.
Bharat Jodo Yatra latest news
Bharat Jodo Yatra latest newssarkarnama
Published on
Updated on

Bharat Jodo Yatra : कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. आज (सोमवारी) रात्री नऊ वाजता त्यांचे नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे आगमन होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेसने जय्यत तयारी केली आहे. भारत जोडो यात्रेसाठी राज्यभरातून नागरिक सहभागी होणार आहेत.(Bharat Jodo Yatra latest news)

भारत जोडो यात्रेतील सहभागी मान्यवरांसाठी भोजनाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये थालीपीठ, आंबट वरण, बाजरीची भाकरी, पिठले, दही-धपाटे, शेवभाजी, वांग्याचे भरीत हा मेन्यू असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. या यात्रेच्या निमित्ताने पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

भारत जोडो यात्रा ७ ते ११ नोव्हेंबरदरम्यान नांदेड जिल्ह्यात असणार आहे. चार मुक्काम जिल्ह्यात मुक्काम असणार आहेत. भारत जोडो यात्रेच्या प्रचार आणि प्रसारासाठी एक नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील वाडी, वस्ती, तांड्यावर आठ एलईडी डिजिटल व्हॅन फिरत आहेत.

या माध्यमातून पदयात्रेचे इतर ठिकाणचे व्हिडिओ, नेत्यांच्या प्रतिक्रिया, फोटो, लघुपट दाखवण्यात येत आहेत. दररोज ५० किलोमीटरचे अंतर ही व्हॅन पूर्ण करते. नांदेड जिल्ह्यातीलही यात्रेचे चित्रीकरण दाखवण्यात येणार आहे.

Bharat Jodo Yatra latest news
Raj Thackeray : मी, फडणवीस, सीएम एकत्र बघून लोकांना वाटेल एकावर एक फ्री आहे का ?

भारत जोडो यात्रेचे ३ कॅम्प करण्यात आले आहेत. एक नंबरच्या कॅम्पमध्ये राहुल गांधी व काँग्रेसचे नेते असतील. दोन नंबरच्या कॅम्पमध्ये प्रमुख पाहुणे, नेते, राज्यातील काँग्रेसचे नेते, महिला काँग्रेस, सेवादल असे जवळपास हजार लोकांचा यात सहभाग असेल, तर ३ नंबरच्या कॅम्पमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी यांचा यात समावेश असणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

महाराष्ट्रात प्रवेश केल्यावर राहुल गांधी हे रात्री नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत. त्यानंतर मशाल हातात घेऊन गुरुनानक जयंती निमित्त राहुल गांधी गुरुद्वारा इथे जाणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com