''भास्करराव खतगावकरांच्या कॉंग्रेस प्रवेशामुळे भाजपला निवडणूक जिंकणं अवघड"

दोन दिवसांपूर्वी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
''भास्करराव खतगावकरांच्या कॉंग्रेस प्रवेशामुळे  भाजपला निवडणूक जिंकणं अवघड"
Published on
Updated on

नांदेड : भाजप नेते भास्करराव पाटील खतगावकर (Bhaskarrao Patil) यांनी दोन दिवसांपूर्वीच भाजपला रामराम ठोकला आणि कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र याचा मोठा फटका भाजपला बसणार असल्याचे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. भास्करराव पाटील खतगावकर कॉंग्रेसमध्ये गेल्याने देगलूर विधानसभेची निवडणूक जिंकण भाजपसाठी अवघड होणार असल्याचं वक्तव्य स्वत: चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. पाटील काल देगलूर येथे प्रचारासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

''भास्करराव खतगावकरांच्या कॉंग्रेस प्रवेशामुळे  भाजपला निवडणूक जिंकणं अवघड"
खतगांवकरांनी पक्ष सोडल्यानंतर चिखलीकरांची सारवासारव; तर साबणे टेन्शनमध्ये

मात्र, खतगावकर गेले तरी देगलूर निवडणूक भाजप जिंकणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. ''पंढरपुरच्या निवडणुकीत कल्याण काळे भाजपमध्ये आले आणि पुन्हा राष्ट्रवादीत गेले तरीही पंढरपूर भाजपनं जिंकलं. खतगावकर गेले तरी देगलूर ची निवडणूक आम्ही जिंकू.'' असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटल आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खतगावकर यांनी सात वर्षांपूर्वी कॉंग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता. मात्र खतगावकर यांनी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून भाजपात आपली घुसमट होत असल्याने आपण आपल्या कार्यकर्त्यांसह पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचे सांगितले.

तसेच, जनतेच्या आशीर्वादाने आतपर्यंत देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातून मी तीन वेळा विजयी झालो. लोकसभेतही तीन वेळा प्रतिनिधीत्व करण्याची मला संधी मिळाली. पण भाजपात माझी मतं विचारात घेतली गेली नाही. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या एकाधिकार शाहीला मी कंटाळलो असल्याचं सांगत त्यांनी अखेर भाजपला रामराम ठोकला.

नांदेड जिल्ह्यातील मातब्बर नेते म्हणून भास्करराव पाटील खतगावकर यांची ओळख आहे. मात्र ते भाजपत आल्यानंतर नाराज होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीदेखील खतगावकर यांच्या राजेंद्रनगर नांदेड येथील निवासस्थानी ३ ऑक्टोबरला जाऊन भेट घेतली होती. या भेटीत देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसंबंधी फडणवीस व भास्करराव पाटील खतगावकर यांच्यात बंद खोलीत अर्धातास चर्चा झाली होती. त्यावेळी फडणवीस खतगावकरांची मनधरनी करण्यात यशस्वी झाल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र, खतगावकरांनी काँग्रेस प्रवेशा केल्याने आता भाजपला मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com