Bhokar APMC Result : अशोक चव्हाणांनी भाजप, बीआरएसला रोखत बाजी मारली..

Nanded : अशोक चव्हाण यांनी स्वतः लक्ष देऊन तीन दिवस तळ ठोकून विजयासाठी आखणी केली होती.
Bhokar APMC News, Nanded
Bhokar APMC News, NandedSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : नांदेड जिल्ह्यातील आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकर बाजार समितीच्या (Bhokar APMC Result) निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. निवडणुकी दरम्यान अनेक नाट्यमय घडामोडी येथे घडल्या होत्या. भोकर बाजार समितीवर आपली एकहाती सत्ता राहावी यासाठी चव्हाणांनी केलेली खेळी यशस्वी ठरली. त्यांनी ठाकरे गटाला वगळून फक्त राष्ट्रवादीला सोबत घेत आघाडी केली. नव्या चेहऱ्यांना संधी दिली, त्यामुळे नाराज झालेल्यांनी बीआरएसचा रस्ता धरत निवडणुका लढवल्या. पण याचा चव्हाणांना तोटा होण्याऐवजी फायदाच झाला.

Bhokar APMC News, Nanded
Parli APMC Result News : धनंजय मुंडेची खेळी, शेठ पडले अन् मुनिम निवडून आले..

भाजपचे खासदार प्रताप पाटील (Pratap Patil Chikhlikar) यांनी जोर लावला पण त्यांच्या राजकारणाला ओळखून असलेल्या अशोक चव्हाणांनी (Ashok Chavan) त्यांचेही मनसुबे उधळून लावले. भोकर बाजार समितीमधील सत्ता कायम राखत चव्हाणांनी पुन्हा एकदा आपले नेतृत्व सिद्ध केले. भोकर येथील डॉ. शंकरराव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर होताच काँग्रेस, भाजप, बिआरएस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानी सत्तास्थापनेसाठी कंबर कसली होती.

सत्तास्थानी असलेल्या काँग्रेस पक्षाला कोंडीत पकडण्यासाठी भाजप आणि बिआरएस, शिवसेना ठाकरे गटांनी डावपेच आखले होते. (Marathwada) तिरंगी लढतीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सावध भूमिका घेत काँग्रेसच्या गडात विरोधकांचा शिरकाव होणार नाही याची कटाक्षाने दक्षता घेत १८ पैकी १५ जागेवर यश मिळवले. भाजपला केवळ तीन जागेवरच समाधान मानावे लागले. तर बिआरएसला मतदारांनी पुर्णपणे नाकारले आहे.

एकंदरीत मतदार काँग्रेसच्या बाजूने भक्कमपणे उभा असल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. अशोक चव्हाण यांनी स्वतः लक्ष देऊन तीन दिवस तळ ठोकून विजयासाठी आखणी केली होती. भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही विशेष लक्ष घातल्याने आणखी रंगत वाढली होती. नव्याने शिरकाव केलेल्या बिआरएस पक्षाचे प्रमुख नेते नागनाथ घिसेवाड यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली, पण मतदारांनी त्यांना स्थान दिले नाही.भाजपाने मागील निवडणुकीत दोन जागेवर विजय मिळवला होता. या वेळी एक जागा वाढल्याने तीन जागेवर त्यांना समाधान मानावे लागले. व्यापारी मतदार व हमाल माथाडी कामगार संघात एकतर्फी मतदान झाल्याने तीन उमेदवार विजयी झाले.

ग्रामपंचायत मतदारसंघात काँग्रेसने तीन जागा पटकावल्या तर भाजपने एका जागेने खाते उघडले. सेवा सहकारी सोसायटीत काँग्रेसनी बाजी मारली आहे आणि भाजपने दोन जागेवर यशश्री खेचून आणली. काँग्रेस पक्षातील विद्दमान सभापती जगदीश पाटील भोसीकर, उपसभापती गणेश राठोड, संचालक रामचंद्र मुसळे आणि नवीन सहा उमेदवार यांना मतदारांनी स्वीकारले आहे. भाजपाचे संचालक गणेश कापसे, संचालक सुभाष पाटील कीन्हाळकर यांनी पुन्हा एन्ट्री केली असून भाजपचे तालुकाध्यक्ष कीशोर पाटील लगळुदकर यांनी नव्याने जम बसविला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com