Bhokar Assembly Election : भोकरकरांच्या सेवेसाठी राजकारणात पाऊल : श्रीजया चव्हाण

माझे आजोबा केंद्रीय गृहमंत्री (कै.) शंकरराव चव्हाण,वडील माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, आई माजी आमदार अमिता चव्हाण यांनी राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून वेगळी ओळख निर्माण केली.
Bhokar Assembly Election sreejaya chavan why she join politics
Bhokar Assembly Election sreejaya chavan why she join politics
Published on
Updated on

भोकर : माझे आजोबा केंद्रीय गृहमंत्री (कै.) शंकरराव चव्हाण,वडील माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, आई माजी आमदार अमिता चव्हाण यांनी राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी संबंध आयुष्य समाजसेवेसाठी झोकून दिले. अशा संयमी व सुसंस्कारित कुटुंबात माझा जन्म झाला हे माझं भाग्य समजते. उच्च शिक्षणानंतर मी मुंबईत वकीली केली तेथे फार काळ मन रमल नाही.

ज्या मतदारांनी आमच्या कूटुबियांना रक्तातील नात्यापेक्षाही अधिक जीव लावला त्यांची सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून मी राजकीय क्षेत्रात पहिलं पाऊल टाकले आहे, अशी भावना भोकर विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या ऊमेदवार श्रीजया अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. विविध विषयांवर श्रीजया चव्हाण यांनी आपली भूमिका व मते परखडपणे मांडली.

तसेच भोकर विधानसभा मतदारसंघासाठी असलेले विकासाचे व्हिजन स्पष्ट केले. मतदारसंघातील जनतेनेच मला यावेळी संधी देण्यात यावी असा आग्रह धरला होता. त्यामुळेच मी धाडस केले. यात कसली घराणेशाही आहे. विरोधकांकडे दुसरे मुद्देच नाहीत म्हणून ते हा आरोप करीत आहेत. माझे आजोबा, आई, वडीलांनी आजपर्यंत या मतदारसंघातील जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत म्हणून तर विकासाच्या बाबतीत मतदारसंघाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. काम करीत असताना काही उणीवा राहतात.

त्याचा मी पाठपुरावा करून त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी जनतेची भक्कम साथ हवी आहे. रोजगार आणि शिक्षण हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे याची मला जाणीव आहे. कुठल्याही गोष्टी एकाच वेळी शक्य होत नाहीत.

यासाठी भविष्यात रोजगार मेळावे घेऊन युवकांना दिलासा देण्याचा मानस आहे. राहिला प्रश्न उच्च शिक्षणाचा त्याविषयी लवकरच तोडगा काढण्यासाठी कटिबद्ध आहोत. याशिवाय प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे श्रीजया चव्हाण यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणार

भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो त्यामुळे शेतीविषयक विविध योजना, शेतीपूरक व्यवसायासाठी व्यापक मोहिम हाती घेवून हजारो हेक्टर जमिन ओलिताखाली येण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिले जाईल.

शहरातील पाणीप्रश्न कायमचा मिटला आहे. वाडी-तांड्यावर उन्हाळ्यात टंचाई जाणवते. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी वडीलांनी सुमारे सातशे कोटींचा निधी वापरून ग्रीड योजने अंतर्गत जल जीवन मिशनच्या आधारे ‘हरघर नल’योजना केल्याने भविष्यात टंचाई जाणवणार नाही, असे त्या म्हणाल्या. माझे आजोबा फार संयमी होते आणि सार्वजनिक समाजहिताच्या कामांना त्यांनी प्राधान्य देवून सेवावृत्ती जोपासली आहे.

तोच गुण आई-वडीलांत आणि माझ्यात उतरला आहे. मतदारसंघात माझ्या वडिलांनी विकासाला झुकते माप देवून जनतेची गैरसोय दूर केली. त्यांची पुण्याई म्हणून आज मला प्रचारात नात, लेक, भाची म्हणून आपुलकी मिळते आहे. मतदानरूपी आशिर्वाद हमखास मिळेलच, यापेक्षा आणखी काय हवं, असेही श्रीजया चव्हाण म्हणाल्या. महिला आता पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहेत. महिला बचत गटांची व्याप्ती वाढवून स्वावलंबी जीवन जगता याव म्हणून प्रयत्न करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com