Bhokardan Assembly Election : विरोधकांकडे विकासाचे व्हिजनच नाही : संतोष दानवे

निवडणुकीच्या तोंडावर जातीपातीच्या मुद्द्यांवरून समाजामध्ये द्वेष निर्माण करायचा, कर्जमाफी आणि फसव्या योजनांचे आमिष दाखवण्याचे काम विरोधक करीत आहेत. विकासाचे कुठलेच व्हिजन विरोधक उमेदवाराकडे नाही
Bhokardan Assembly Election 2024 santosh danve criticize opposition over its vision
Bhokardan Assembly Election 2024 santosh danve criticize opposition over its vision
Published on
Updated on

भोकरदन : निवडणुकीच्या तोंडावर जातीपातीच्या मुद्द्यांवरून समाजामध्ये द्वेष निर्माण करायचा, कर्जमाफी आणि फसव्या योजनांचे आमिष दाखवण्याचे काम विरोधक करीत आहेत. विकासाचे कुठलेच व्हिजन विरोधक उमेदवाराकडे नाही, अशी टीका महायुतीचे उमेदवार आमदार संतोष दानवे यांनी मतदार संघातील डोणगाव,निवडुंगा, पोखरी ,बुटखेडा ,अकोला देव गावातील प्रमुखांच्या बैठकीत केली.

भाजप सत्तेत नसताना मी स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मतदार संघात बैलगाडीत बसून शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. याउलट विरोधक उमेदवारांनी दहा वर्षात जनतेसाठी काय केले ? निवडणुकीच्या तोंडावर फक्त मत मागायची आणि विशिष्ट लोकांना फक्त खुश करायचे एवढेच काम विरोधक करू शकतात.

दहा वर्षात मी केलेली विकास कामांची यादी माझ्याकडे आहे, आगामी काळात काय करणार याची ब्ल्यू प्रिंट माझ्या हातात आहे. महायुती सरकारकडे भविष्याचे नियोजन आहे. कोविड काळात घरात बसून राहणारे महाविकास आघाडीचे नेते अडीच वर्षाच्या काळात महायुती सरकारच्या योजनांना स्थगिती देण्याचे काम करत होते.

विकासाच्या कुठल्याच मुद्द्यावर यांच्याकडे एकमत नाही हे महाराष्ट्रातील जनतेला काय देणार? असा सवाल दानवे यांनी यावेळी केला. आगामी काळात देखील मतदार संघातील राहिलेल्या विकास कामांसाठी तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याची मला आवश्यकता आहे. येणाऱ्या येणाऱ्या 20 तारखेला सेवेची पुन्हा संधी द्या, उर्वरित विकासकामे पुर्ण करून मतदारंसघाचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही दानवे यांनी उपस्थितांना दिली. यावेळी भाजपा महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने ग्रामस्थ बंधू-भगिनींची उपस्थिती होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com