Bhum-Paranda Assembly Constiteuncy : विकासाच्या राजकारणाला महत्त्व देत आलो - आमदार प्रा.डाॅ. तानाजी सावंत

साखर कारखान्याअभावी मतदारसंघातील शेतकऱ्यांना आपला ऊस आटपाडीपर्यंत नेण्याची वेळ आली. तर, अनेकांना ऊस तोडून बांधावर टाकावा लागला.
Bhum-Paranda Assembly election 2024 mla tanaji sawant importance to development works politics
Bhum-Paranda Assembly election 2024 mla tanaji sawant importance to development works politics
Published on
Updated on

वाशी : साखर कारखान्याअभावी मतदारसंघातील शेतकऱ्यांना आपला ऊस आटपाडीपर्यंत नेण्याची वेळ आली. तर, अनेकांना ऊस तोडून बांधावर टाकावा लागला. त्यामुळे आपण शेतकऱ्यांसाठी शिवशक्ती, तेरणा साखर कारखाने सुरू केले असून पुढील चार महिन्यांत नृसिंह कारखानाही सुरू होणार असल्याचे सांगून मी पाऊल ठेवले की विकास होतो,

असा दावा शिवसेना महायुतीचे भूम-परांडा मतदारसंघाचे उमेदवार तथा आमदार प्रा.डाॅ. तानाजी सावंत यांनी केला. मतदार संघातील पारा येथे झालेल्या सभेत सावंत यांनी विरोधकांवर टीका केली. माझ्यामुळे विकास होतो तर, माजी आमदाराने मतदारसंघात पाऊल ठेवले की दुष्काळ पडतो, असेही सावंत म्हणाले.

परांडा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रा.डॉ. सावंत यांच्या प्रचारार्थ सोमवारी तालुक्यातील विविध गावात सभा झाल्या. पारा येथील सभेत बोलताना आपण विकासाच्या राजकारणाला महत्त्व देत आलो असल्याचे सांगून मागील अडीच वर्षांच्या मंत्रिपदाच्या काळात केलेल्या विविध विकासकामांची माहिती प्रा.डॉ. सावंत यांनी यावेळी दिली.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष राजगुरू कुकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. सूर्यकांत सांडसे, शिवसेना तालुकाध्यक्ष ॲड. सत्यवान गपाट, प्रा. किशोर पानसे, बाळासाहेब हांडोग्रीकर, भैरवनाथ शुगर वर्क्सचे कार्यकारी संचालक केशव सावंत, युवासेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब मांगले, तालुका संघटक शिवहार स्वामी, गटनेते नागनाथ नाईकवाडे,

विकास तळेकर, बिभीषण खामकर, दत्ता तोडकर, सुनील मोरे, सोमनाथ शिंदे, सरपंच राजेंद्र काशीद, विष्णू मुरकुटे, विश्वंभर भराटे, सुनिल उंदरे, नितीन रणदिवे, पोपट मोरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com