Marathwada : महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन महत्वाच्या नेत्यांचा आज वाढदिवस. योगायोगाने हे दोघे आज राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. (Pankaja Munde News) माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थ मंत्री अजित पवार. आज या दोघांवर सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही कडील नेते, लोकप्रतिनिधी, आमदार, खासदारांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी देखील फडणवीस, पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटच्या माध्यमातून दिलेल्या शुभेच्छांमध्ये त्यांनी हा युनिक योग असल्याचे म्हटले आहे. (Marathwada) २०१९ मध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून झालेला पराभव, त्यानंतर सातत्याने पक्षाकडून डावलण्यात आल्याची पंकजा आणि त्यांच्या समर्थकांची भावना लक्षात घेता पंकजा यांनी शुभेच्छांमधून देखील या जोडीला उपरोधिक टोला लगावल्याची चर्चा होत आहे.
परळीतील पराभवाला राज्यातील प्रमुख नेत्यांनी हातभार लावल्याचा आरोप करत पंकजा यांनी फडणवीसांकडे (Devendra Fadanvis) बोट दाखवले होते. त्यानंतर सातत्याने फडणवीस यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर येण्याचे त्या टाळत होत्या. नाराजीच्या चर्चा जेव्हा जेव्हा झाल्या, तेव्हा पंकजा यांनी स्पष्टीकरण देतांना आपले नेते मोदी, शहा हे असल्याचे सांगत फडणवीसांचे नेतृत्व आपण मानत नसल्याचे अधोरेखित केले होते. सध्या दोन महिन्यांच्या राजकीय ब्रेकवर असलेल्या पकंजा यांनी फडणवीस आणि पवार या दोन मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या आवर्जून शुभेच्छा दिल्या आहेत.
`दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा वाढदिवस एकाच दिवशी हा योग युनिक आहे. फडणवीसजी आणि अजित पवारजी आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! हे वर्ष आपल्या नेतृत्त्वात महाराष्ट्राला उत्तम जावो`, अशा शब्दात पकंजा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. २०१९ मध्ये राज्यात अजित पवारांसोबत झालेल्या फडणवीसांचा पहाटेचा शपथविधी आणि आता पुन्हा राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवारांचा समर्थक आमदारांसह प्रवेश या पार्श्वभूमीवर पंकजा यांनी दिलेल्या शुभेच्छा बऱ्याच बोलक्या आहेत.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.