Mla Abhimanyu Pawar Gift To Carrier : वाढदिवस पालकमंत्र्यांचा, हमाल बांधवांना अपघात व विमा कवचाची भेट आमदारांकडून...

Bjp : दोन्ही विमा योजनांचा सर्व ६८ हमाल बांधवांचा दरवर्षीचा प्रीमियम फाऊंडेशनच्या वतीने भरण्यात येणार
Mla Abhimanyu Pawar Gift To Carrier News
Mla Abhimanyu Pawar Gift To Carrier NewsSarkarnama
Published on
Updated on

Latur District News : औशाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) हे आपल्या निरनिराळ्या उपक्रमांमुळे कायम चर्चेत असतात. मग त्यांच्या शेत रस्त्याचा पॅटर्न असो, की नुकताच त्यांनी आपल्या मुलाचा सामुहिक सोहळ्यात केलेला विवाह असो. या अभिमन्यू पॅटर्नची चर्चा राज्यभरात होत असते. नुकत्याच झालेल्या औसा बाजार समिती निवडणुकीत आमदार पवारांनी पॅनल देतांना जाहीरनाम्यात दहा गोष्टींचे वचन दिले होते.

Mla Abhimanyu Pawar Gift To Carrier News
Raosaheb Danve Watched The Kerala Story: चारशे महिलांसोबत दानवेंनी पाहिला `द केरळा स्टोरी`, सेल्फीही दिल्या..

त्यापैकीच एक म्हणजे बाजार समितीतील हमाल बाधवांना अपघात व मुदत विम्याचे मोफत कवच देण्याचे आश्वासन. (Bjp) निवडणुकीनंतर लगेच त्यांनी या वचनाची पुर्ती केल्याचे दिसून आले. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत अभिमन्यू पवार यांनी हमाल बांधवांना विम्याचे कवच भेट म्हणून दिले.

औसा बाजार समितीत (Latur) कार्यरत असलेल्या हमाल बांधवांना क्रिएटिव्ह फाऊंडेशनच्या मदतीने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत २ लक्ष रुपयांचा मुदत विमा कवच आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत २ लक्ष रुपयांचे अपघात विमा कवच मोफत उपलब्ध करून देण्यात आले.

दोन्ही विमा योजनांचा सर्व ६८ हमाल बांधवांचा दरवर्षीचा प्रीमियम फाऊंडेशनच्या वतीने भरण्यात येणार असून हमाल बांधवांना आजीवन मोफत विमा कवच उपलब्ध झाले आहे. बाजार समिती आवारात संपन्न झालेल्या छोटेखानी कार्यक्रमाला उपस्थित राहून हमाल बांधवांना विमा प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

या सर्व हमाल बांधवांना व त्यांच्या कुटुंबियांना लवकरच आयुषमान भारत कार्ड्स काढून देण्यात येणार असून त्यानंतर त्यांना ५ लक्ष रुपयांचे आरोग्य विमा कवच सुद्धा उपलब्ध होईल, असे सांगतांनाच दिलेला शब्द पूर्ण करू शकल्याचा मनस्वी आनंद होत असल्याची भावना आमदार अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com