Ajit Pawar Vs Suresh Dhas : अजित पवार गटामुळं आमचं वाटोळं झालं; सुरेश धसांची खदखद बाहेर

Maharashtra Vidhan Sabha Election : लोकसभेची चूक विधानसभेत होऊ नये, यासाठी आम्ही भाजपच्या अंतर्गत बैठकीत मागणी करणार
Suresh Dhas
Suresh DhasSarkarnama

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीत भाजपने 28 जागा लढवल्या असल्या तरी त्यांना फक्त 9 जागांवरच समाधान मानवे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केंद्रात हात बळकट करण्यासाठी भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोबत घेतले. मात्र हा डाव राज्यात उलटल्याचा सूर भाजपमध्ये आहे.

यावर भाजपच्या वरीष्ठ नेत्यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला, तरी भाजपचे काही नेते आणि पदाधिकारी आता उघडपणे अजितदादांवर बोलत आहे. बीडमधील भाजप नेते, माजी मंत्री सुरेश धस यांनी थेट अजित पवार गटामुळे लोकसभेत आमचे वाटोळे झाल्याची टीका केली आहे.

सुरेश धस Suresh Dhas म्हणाले, लोकसभा निवडणुकीत अजित पवार गट आमच्या सोबत आला आणि आमचे वाटोळे झाले. तिसरा गडी आला आणि आमचे मोठे नुकसान झाले. लोकसभेची चूक विधानसभेत होऊ नये, यासाठी आम्ही भाजपच्या अंतर्गत बैठकीत मागणी करणार असल्याचेही धस यांनी स्पष्ट केले आहे.

यावेळी त्यांनी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांचाही समाचार घेतला. मिटकरी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाजपबद्दल बोलायची लायकी आहे का? मंत्री छगन भुजबळ यांनी अनेकदा महायुतीच्या विरोधात स्टॅन्ड घेतलेला आहे. त्यामुळे देखील मोठ्या नुकसान झाल्याची खंत धस यांनी बोलून दाखवली.

Suresh Dhas
Ashish Shelar : 'अभ्यंकर हे भयंकर आणि परब हे अरब; विधानपरिषदेत ठाकरे गटाकडून पैशाचा धुमाकूळ'

लोकसभा निवडणुकीत महायुतीला फक्त 17 जागा मिळाल्या. यानंतर भाजपच्या गोटात अजित पवार Ajit Pawar गटामुळे फटका बसल्याची दबक्या आवाजात चर्चा होती. तर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या 'ऑर्गनायझर' या मासिकातून अजित पवार गटामुळे भाजपची 'ब्रँड व्हॅल्यू' कमी झाल्याची टीका करण्यात आली. या वादावर भाजपच्या नेत्यांनी अजितादादा सोबत असल्याने मतांच्या संख्येत वाढ झाल्याचे सांगून पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

आता मात्र भाजपचे पदाधिकारीही उघडपणे आपणी खदखद बोलून दाखत आहेत. पुण्याचे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांच्यानंतर भाजप नेते सुरेश धस यांनीही लोकसभेत महायुतीच्या पडझडीला आणि भाजपच्या पानीपतास अजित पवार कारणीभूत असल्याचे जाहीरपणे बोलून दाखवले.

सुदर्शन चौधरी यांनी भाजप आमदार राहुल कुल Rahul Kul यांच्या समोर अजित पवारांवर हल्लाबोल केला. अजित पवारांनी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला. ते सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको. पालकमंत्री म्हणून ते आमच्या बोकांडी नको. महायुतीतून अजित पवारांना बाहेर काढा, असा आग्रहच भाजपश्रेष्ठींसमोर धरला.

चौधरी यांच्यानंतर धस यांनीही अजित पवारांविरोधात मोहीम उघडल्याचे दिसून येत आहे. यातून महायुतीतील भाजप आणि अजित पवार गट यांच्यात काही अलबेल नसल्याचे स्पष्ट होत आहे. आपले पदाधिकारी आणि नेत्यांच्या भूमिकेवर भाजप काय उत्तर देणार आणि भाजप नेत्यांच्या विधानांना अजित पवारांचे प्रत्युत्तर काय असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Suresh Dhas
Beed Breaking News : बीडमधून मोठी बातमी! l 'त्या' Viral Clip नंतर मुंडे समर्थकांनी कुंडलिक खाडेंचं ऑफिस फोडलंं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com