Amaravati Lok Sabha Election 2024 Result : 'चलती हूं दुआओं मै याद रखना'; नवनीत राणांना काँग्रेसचा इंगा...

Navneet Rana And Balwant Wankhade Politics : अमरावती मतदारसंघात महाविकास आघाडीचे बळवंत वानखडे यांनी निर्णायात आघाडी घेतली आहे. त्यामुळे भाजप उमेदवार नवनीत राणा पराभवाच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत.
Navneet Rana
Navneet Ranasarkarnama

सुरेंद्र चपोरकर

Amaravati Lok Sabha Election : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी घेतलेला पंगा, भाजपच्या अंतर्गत विरोधाला न जुमानता तिकीट आणणे आणि अमरावतीच नव्हे तर, राज्याच्या अनेक नेत्यांवर टीका करून अमरावती मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपच्या नवनीत राणा आता पराभवाच्या छायेत आहे. काँग्रेसचे बळवंत वानखडे यांना टक्कर देणाऱ्या राणा 30 हजार मतांनी पिछाडीवर आहेत.

या निवडणुकीत नवनीत राणा यांना भाजपची (BJP) उमेदवारी देण्याबाबत अंतर्गत विरोध होता. महायुतीचे घटकपक्ष असलेल्या शिवसेनेचे (शिंदे गट) माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी ही जागा शिवसेनेची असल्याचा दावा करीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा केली होती. महायुतीत असलेल्या अजित पवार गटाचे नेते संजय खोडके यांनी त्यांचा फोटो राणा यांच्या पोस्टरवर लावण्यासाठी विरोध करत निवडणुकीपासून अलिप्त राहण्याची भूमिका घेतली होती.

भाजपचे नेते तुषार भारतीय यांनी सुद्धा राणांचा प्रचार करणार नाही, असे स्पष्ट केले होते. विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांचा विरोध राणा यांना होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी तसेच काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडणूक जिंकली होती. परंतु त्यानंतर त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला साथ दिल्याने अल्पसंख्याक तसेच दलित मते त्यांच्या विरोधात जातील, असे मानले जात होते. यंदा अधिक प्रमाणात झालेले मतदान महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी पोषक असल्याचे सुद्धा मानले जात होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Navneet Rana
Vidarbha Exit Poll: विदर्भातून कोणाची 'एक्झिट' होणार; महायुती की महाविकास आघाडी? नाराजी भोवणार...

मतमोजणीला सुरवात झाल्यावर पहिल्या चार फेऱ्यांमध्ये महाविकास आघाडीचे बळवंत वानखडे आघाडीवर होते. भाजपच्या नवनीत राणा दुसऱ्या क्रमांकावर तर, प्रहारचे दिनेश बूब तिसऱ्या स्थानावर होते. पाचव्या फेरीअखेर मात्र, नवनीत राणा यांनी आघाडी घेण्यास सुरवात केली होती. परंतु दुपारीपर्यंत या दोघांमध्ये चढाओढ सुरू राहिली. दुपारीनंतर वानखडे निर्णायक मतांची आघाडी घेतली. परिणामी नवनीत राणा पराभवच्या उंबरठ्यावर उभ्या राहिल्या आहेत.

Navneet Rana
Exit Poll: धोके की खासियत…! फडणवीस-शिंदे-अजितदादांसारखे सक्षम नेते, पण महायुती 30 जागांचा आकडा गाठणार नाही

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com