Vidarbha Exit Poll: विदर्भातून कोणाची 'एक्झिट' होणार; महायुती की महाविकास आघाडी? नाराजी भोवणार...

Vidarbha Lok Sabha Result 2024 Exit Poll: Sudhir Mungantiwar, Navneet Rana, Raju Parve: मागील निवडणुकीत विदर्भातील 10 लोकसभा मतदारसंघापैकी नऊ जागा जिंकणाऱ्या भाजप-शिवसेना युतीला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
Sudhir Mungantiwar, Bhavana Gawali Navneet Rana
Sudhir Mungantiwar, Bhavana Gawali Navneet RanaSarkarnama

Vidarbha Lok Sabha Result 2024 Exit Poll: मागील निवडणुकीत विदर्भातील 10 लोकसभा मतदारसंघापैकी नऊ जागा जिंकणाऱ्या भाजप-शिवसेना युतीला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात भाजपला राज्यात 17 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे विदर्भातून (Vidarbha) कोणाची एक्झिट होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

2019 च्या निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा अपवात वगळता विदर्भातील 9 जागा युतीने जिंकल्या होत्या. तर यंदाच्या निवडणुकीत चंद्रपूरची जागा जिंकण्यासाठी भाजपने मोठी खेळी केली. माजी खासदार आणि केंद्रीयमंत्री हंसराज अहीर यांना डावलून राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना मैदानात उतरवलं. संसदेत जाण्याची आपली इच्छा नसल्याचे मुनगंटीवार सुरुवातीपासूनच सांगत होते. शिवाय आपले तिकीट कापावे अशी प्रार्थना आपण देवाजवळ केल्याचंही त्यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी उघडपणे माध्यमांसमोर म्हटलं होतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यानंतरही पक्षाने त्यांनाच उमेदवारी दिली. विशेष म्हणजे या मतदारसंघातून दिवंगत खासदार बाळू धाणोरकर यांच्या पत्नीला काँग्रेसने मैदानात उतरवलं. तर या उमेदवारीला विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कडाडून विरोध केला होता. शिवाय या जागेवर वडेट्टीवार यांनी या दावा केला होता. काँग्रेसमधील आपसातील मतभेद बघता मुनगंटीवर विजयी होतील असं सर्वांना सुरुवातीला वाटत होतं. मात्र ही लढत चुरशीची झाली, त्यामुळे ही जागा भाजपसाठी धोक्यात असल्याचे बोलले जात आहे.

अशातच आज शनिवारी (1 जून) रोजी आलेल्या ‘एक्झिट पोल'मध्ये चंद्रपूरमध्ये भाजपला पराभूत दाखवत आहे. तर शिंदे सेनेला रामटेक लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघात उमेदवार बदलवणे महागात पडणार असल्याचे एक्झिट पोल दाखवत आहे. येथून सलग दोन वेळा निवडूण आलेले खासदार कृपाल तुमाने यांचे तिकीट कापलं गेलं. भाजपने यासाठी आग्रह धरला होता. त्यांच्याऐवजी काँग्रेसच्या आमदार राजू पारवे यांना आयात करण्यात आले होते. मात्र याचा फायदा महायुतीला झाल्याचे दिसत नाही.

Sudhir Mungantiwar, Bhavana Gawali Navneet Rana
Nanded Lok Sabha Exit Poll 2024 : अशोक चव्हाणांच्या नांदेडमध्ये चिखलीकर 'सेफ'च

तसंच यवतमाळमध्येही विद्यमान खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांना डावलल्याचा फटका महायुतीला बसताना दिसत आहे. वर्धा, गोंदिया-भंडारा, गडचिरोली, अकोला हे मतदारसंघ कायम राखण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. अमरावतीत नवनीत राणा यांना उमेदवारी देण्याचा प्रयोग यशस्वी होईल असा एक्झिट पोलचा अंदाज आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com