Devendra Fadnavis Vote Jihad : ‘व्होट जिहाद’मागे राष्ट्रीय विचार संपवण्याचा डाव; CM फडणवीसांचा 'आम्ही पुन्हा येवू'चा नारा!

Devendra Fadnavis Criticizes Opposition Over 'Vote Jihad' at Deogaon Shani, Vaijapur : छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर इथल्या क्षेत्र देवगाव शनी इथं 178व्या अखंड हरिनाम सप्ताह सांगता सोहळ्यात भाजप सीएम देवेंद्र फडणवीस सहभागी झाले.
Devendra Fadnavis Vote Jihad
Devendra Fadnavis Vote JihadSarkarnama
Published on
Updated on

Deogaon Shani temple politics : "लोकसभेत ‘व्होट जिहाद’चा प्रयोग झाला. काही लोकांनी राष्ट्रीय विचार संपवण्याचा विडाच उचलला होता. हे केवळ राजकीय नव्हे, तर सांस्कृतिक आक्रमण आहे. मूठभर लोक संतांच्या विचारांना नष्ट करू पाहत आहेत.

मात्र संतशक्ती मैदानात उतरल्यामुळे आम्हाला विजय मिळाला", अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय विरोधकांवर अप्रत्यक्ष हल्ला चढवला.

छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या श्री क्षेत्र देवगाव शनी (ता.वैजापूर) इथं 178व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात भाजप सीए देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी ‘व्होट जिहाद’चा प्रयोगाचा पुन्हा उच्चार करत विरोधकांवर हल्लाबोल चढवला.

महंत रामगिरी महाराज, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhepatil), गिरीश महाजन, आमदार रमेश बोरणारे, विठ्ठलराव लंघे, अमोल खाताळ, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, भानुदास मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे आदी उपस्थित होते.

मंत्री फडणवीस म्हणाले, "रामगिरी महाराजांनी चेतना पेटवली. संतशक्ती मैदानात आली, म्हणून आम्ही विजय मिळवू शकलो. ही आध्यात्मिक शक्ती सुविचार देते, राष्ट्रभावना जागवते. आपल्याला जातीभेद विसरून एकसंघ व्हावे लागेल". देश, धर्म आणि परंपरा टिकवण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. काही लोक समाजाला फोडण्याचे प्रयत्न करत आहेत. अशांना उत्तर देण्यासाठी संत विचारांची मशाल महत्वाची ठरेल, असेही फडणवीस यांनी म्हटले.

‘कर्जमाफी’ची ग्वाही

मुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी घोषणा केली. ज्यांनी आम्हाला निवडून दिलं त्या लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांना कधीही पश्चाताप वाटणार नाही. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कटिबद्ध आहे. दुष्काळग्रस्त मराठवाड्यालाही योग्य न्याय दिला जाईल, असेही भावनिक उद्गार त्यांनी काढले.

आता मी नाहीतर, आम्ही पुन्हा येवू..

फडणवीसांनी पुढील राजकीय लढतीत सांस्कृतिक मूल्यांवर आधारित एकत्रित लढ्याची भूमिका भाजप घेणार असल्याचे स्पष्ट संकेत देताना सांगितले की, 'मी जेव्हा म्हणतो पुन्हा येईन, तेव्हा मी येतोच. पुढच्या वर्षी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी येतो, सोबत अजितदादांनाही घेऊन येतो', असे बोलून त्यांनी राजकीय समीकरणांबाबत सूचक विधान केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com