Bjp : लव्ह जिहाद प्रकरणातून धर्मांतराचा डाव ; सावेंचा खासदार इम्तियाज यांच्यावर आरोप..

माझ्यावर करण्यात आलेले आरोप बकवास असून त्यावर मी प्रतिक्रिया देवू इच्छित नाही. पोलिस तपासात सत्य काय आहे ते बाहेर येईलच, अशी भूमिका इम्तियाज यांनी स्पष्ट केली आहे. (Bjp, Aurangabad)
Minister Atul Save-Mp Imtiaz jalil News Aurangabad
Minister Atul Save-Mp Imtiaz jalil News AurangabadSarkarnama

औरंगाबाद : श्रद्धा वालकर हिचे ३५ तुकडे करून आफताबने हत्या केल्याचे प्रकरण देशभरात गाजत असतांना मराठवाड्यासह इतर भागात लव्ह जिहाद आणि बळजबरीने धर्मांतरांची काही प्रकरणे समोर येत आहेत. औरंगाबादेत मुस्लिम मुलीवर प्रेम असणाऱ्या एका हिंदू तरुणाला बळजबरीने धर्मांतर करायाला लावण्यात आल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.

Minister Atul Save-Mp Imtiaz jalil News Aurangabad
Abdul Sattar : कृषीमंत्र्यांचा एक फोन अन् महावितरणची वसुली मोहिम गुंडाळली..

विशेष म्हणजे हिंदू तरुणाला धर्मांतर करण्यासाठी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी दबाव टाकल्याचा आरोप देखील केला जातोय. (Atul Save) या संदर्भात संबंधित तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्यात खासदार इम्तियाज जलील यांच्या अंगरक्षकाने आपल्याला त्यांच्यासमोर मारहाण केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी या तक्रारीची दखल घेतली नाही, असा आरोप करत सहकार मंत्री अतुल सावे, शहर-जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर इतर पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रार करत या संपुर्ण प्रकरणाची आणि खासदार इम्तियाज जलील यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, माझ्यावर करण्यात आलेले आरोप बकवास असून त्यावर मी प्रतिक्रिया देवू इच्छित नाही. पोलिस तपासात सत्य काय आहे ते बाहेर येईलच, अशी भूमिका इम्तियाज यांनी स्पष्ट केली आहे.

एकंदरित लव्ह जिहाद आणि बळजबरीने धर्मांतराच्या या प्रकरणावरून भाजप आणि एमआयएम समोरासमोर येण्याची शक्यता आहे. लव्ह जिहादच्या प्रकरणातील तरूण हा अभियंता दिपक सोनवणे बौद्धधर्मीय असून त्याला मुस्लिम होण्यासाठी खासदार इम्तियाज जलील यांच्या समोर मारहाण झाल्याचा दावा भाजपकडून केला जातोय. २०१८ पासून संबंधित तरुणी आणि दिपकचे प्रेमसंबंध असल्याचे समजते.

संबंधित तरुणी आणि तिच्या कुटुंबियांनी आपल्यावर धर्म बदलण्यासाठी दबाव आणला. एका घरात नेऊन मारहाण केली. पोलिसांत तक्रार देतो म्हणत पैसेही उकळले. त्यानंतर मी देखील संबंधित तरुणीच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली तेव्हा तिच्या कुटुंबियांनी मला तुझे पैसे परत देतो म्हणत रोजाबाग येथे खासदार इम्तियाज जलील यांच्या बंगल्याजवळ बोलावले. तिथे मला मारहाण करून खासदारांच्या सुरक्षा रक्षकांनी बंगल्यात नेले.

माझा मोबाईल खासदारांनी हिसकावून घेतला आणि सुरक्षा रक्षकांकडून मला मारहाण केल्याचे सोनवणे याने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. पोलिस कारवाई करत नसल्यामुळे भाजपच्या शिष्टमंडळाने अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com