BJP District President News: ठाकूर सक्रिय झाल्याने चालुक्य यांची जिल्हाध्यक्षपदी निवड..

Marathwada Political Marathi News: नव्या जिल्हाध्यक्षांना आमदार राणा पाटील व त्यांचे समर्थक कसे सहकार्य करतात हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
BJP District President News
BJP District President News Sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv Political Marathi News: अखेर भाजपच्या रखडलेल्या जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर झाल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर केली. (BJP District President News) आगामी स्थानिक स्वराज्य, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पाहता पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या देवून त्यांना कामाला लावण्यात आले आहे. या निवडीवरून काही ठिकाणी वाद देखील सुरू झाल्याच्या चर्चा आहेत.

BJP District President News
Praful Patel News : दिल्लीतील बैठकीनंतर प्रफुल पटेल म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस आता NDA चा अविभाज्य घटक.."

मराठवाड्यातील धाराशीव (BJP) भाजप जिल्हाध्यक्षपदी संताजी चालुक्य यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड जुन्या भाजपसाठी आश्वासक ठरल्याचे बोलले जात आहे. (Osmanabad) शिवाय नव्या भाजपला संघटनेत महत्वाचे पद देण्यास राजकीयदृष्ट्या विरोध झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यामध्ये भाजपचे वाढते वजन पाहुन कोणाला जिल्हाध्यक्ष पद मिळणार याची उत्सूकता सर्वांना होती.

त्या चर्चेला आता पुर्णविराम मिळाला असला तरी नव्या चर्चेला तोंड फुटल आहे. जुन्या व नव्या भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्याला संधी देऊन योग्य संदेश दिल्याचे दिसते. (Marathwada) भाजपची संस्कृती पाहता संघटनेवर अपवादात्मक परिस्थितीमध्ये नव्याने आलेल्या व्यक्तीला स्थान दिले जाते. गेल्या काही वर्षापासून दोन गटामध्ये चांगलेच शितयुध्द पाहयला मिळाले होते.

नितिन काळे जिल्हाध्यक्ष झाले तरीही त्यांनी नव्याने पक्षात आलेल्यांना अधिक जवळ केले. त्यामुळे दोन गटातील संघर्ष अधिक टिपेला पोहचला होता. अनेक पदाधिकार्‍यांनी तर जिल्हाध्यक्षाविरोधात थेट भुमिका घेऊन बैठका घेतल्या होत्या. आमदार राणा पाटील यांचे पक्षात वाढत असलेले महत्व पाहून त्यांच्याच गटाल‍ा अध्यक्ष पद मिळेल असा कयास बांधला जात होता.

पण शेवटी अनेक वर्ष इच्छा असलेले संताजी चालुक्य यांना कायम डावलले गेले होते. यावेळी मात्र माजी आमदार सुजीतसिंह ठाकुर यांच्या माध्यमातून निवडीचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे. आता या नव्या जिल्हाध्यक्षांना आमदार राणा पाटील व त्यांचे समर्थक कसे सहकार्य करतात हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. एकंदरित भाजपमध्ये इतर पक्षातील नव्या पदाधिकाऱ्यांची गर्दी वाढत असली तरी या गर्दीत भाजपचे मुळचे जुने कार्यकर्ते, पदाधिकारी मागे पडणार नाहीत, याची काळजी पक्षश्रेष्ठींनी जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करतांना घेतल्याचे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com