Maharashtra Assembly News : विधीमंडळ समित्यांवर मराठवाड्यातून भाजपने दानवे, कुचे, मुंदडा यांना दिली संधी!

BJP gives opportunities to Danve, Kuche, and Mundda from Marathwada in state legislature committees. : महाराष्ट्र विधीमंडळाच्या विविध समित्यांवर एकूण 29 सदस्यांची नियुक्ती केली जाते. महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने सर्वाधिक 11 सदस्यांना संधी देत त्यांची नावे जाहीर केली आहेत.
MLA Santosh Danve-Namita Mundada-Narayan Kuche News
MLA Santosh Danve-Namita Mundada-Narayan Kuche NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : राज्य विधीमंडळाच्या 2024-2025 या कार्यकाळासाठी जाहीर करण्यात आलेल्या विविध समित्यांवर सदस्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. यात मराठवाड्यातून भोकरदन-जाफ्राबाद मतदारसंघाचे आमदार संतोष दानवे, बदनापूरचे नारायण कुचे तर केजच्या आमदार नमिता मुंदडा यांची वर्णी लागली आहे. भाजपने एकूण 11 जणांची निवड जाहीर केली आहे. शिवसेना-राष्ट्रवादीच्या सदस्यांची अद्याप नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत.

महाराष्ट्र विधीमंडळाच्या विविध समित्यांवर एकूण 29 सदस्यांची नियुक्ती केली जाते. महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने सर्वाधिक 11 सदस्यांना संधी देत त्यांची नावे जाहीर केली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadnavis) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजप विधीमंडळ मुख्य प्रतोद रणधीर सावरकर यांच्या संमतीने या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

पंचायत राज समितीच्या अध्यक्ष पदी भोकरदनचे आमदार संतोष दानवे (Santosh Danve) यांची निवड करण्यात आली आहे. दानवे हे भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव आहेत. भोकरदन-जाफ्राबाद मतदारसंघातून ते सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत तर अनुसूचित जाती कल्याण समितीच्या अध्यक्ष पदी बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

MLA Santosh Danve-Namita Mundada-Narayan Kuche News
Shivsena-BJP Cold War : शिवसेना-भाजपमध्ये अखेर जुंपलीच; फडणवीसांच्या निकटवर्तीयास शिंदेंचा मंत्री देणार टशन

रावसाहेब दानवे यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख आहे. ते बदनापूरमधून सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. तसेच धर्मादाय खाजगी रुग्णालय तपास समितीवर केजच्या आमदार नमिता मुंदडा या अध्यक्ष म्हणून कामकाज पाहणार आहेत. मुंदडा या राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या समर्थक म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी केजमधून सलग दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली आहे. भाजपच्या वाट्याला 11 समित्या, तर शिवसेनेच्या वाटेला 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला 5 समित्यांच्या सदस्यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती आहे.

MLA Santosh Danve-Namita Mundada-Narayan Kuche News
Devendra Fadnavis यांच्या चाळणीत 16 अधिकारी सापडले फिक्सर; 109 जण पास

विविध समित्यांचे अध्यक्ष पुढील प्रमाणे

सार्वजनिक उपक्रम समिती- राहुल कुल

पंचायत राज समिती- संतोष दानवे-पाटील

आश्वासन समिती- रवी राणा

अनुसूचित जाती कल्याण समिती- नारायण कुचे

अनुसूचित जमाती कल्याण समिती- राजेश पाडवी

महिला हक्क व कल्याण समिती- मोनिका राजळे

मराठी भाषा समिती- अतुल भातखळकर

विशेष हक्क समिती- राम कदम

धर्मादाय खाजगी रुग्णालय तपास समिती: नमिता मुंदडा

आमदार निवास व्यवस्था समिती- सचिन कल्याणशेट्टी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com