Aurangabad : केंद्रात-राज्यात भाजपचीच सत्ता, तरी गोपीनाथ मुंडे स्मारकाला मुहूर्त लागेना..

Gopinath Munde :क्रांतीचौकजवळील दूध डेअरीच्या सहा एकरपैकी दोन एकर जागेवर गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारले जाणार आहे.
Let.Gopinath Munde Memorial News, Aurangabad
Let.Gopinath Munde Memorial News, AurangabadSarkarnama

Marathwada Political : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय तत्कालीन भाजप (Bjp) सरकारने घेतला होता. परंतु, स्मारक उभारणीची मुदत २०२१ पर्यंत असताना २०२३ उजाडले तरीही स्मारकाची एक वीटही रचली गेले नाही. उलट हा प्रकल्प ५० कोटी ६१ लाखांवरून ७६ कोटींवर गेला आहे. स्मारकासाठी तत्कालीन महसूलमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दोन जून २०१५ रोजी समिती गठित करण्यात आलेली होती.

Let.Gopinath Munde Memorial News, Aurangabad
Aurangabad : सत्तारांचा निशाणा शिरसाटांवर ? पण ते काहीच बोलेना..

सदर स्मारक तयार करण्यासाठी सिडको विभागाकडून आलेल्या प्रस्तावाला २०१९ला तत्कालीन सरकारने वर्क ऑर्डरला मान्यता दिली. (Aurangabad) दरम्यान २०२१ पर्यंत स्मारक बांधण्यासाठी ५० कोटी ६१ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. परंतु ज्या परिसरात हे स्मारक होणार होते त्या परिसरात लावण्यात आलेल्या झाडे तोडण्याची परवानगी वृक्ष प्राधिकरणाच्यावतीने मिळण्यास विलंब झाला. (Gopinath Munde) यात तीन वर्षांमध्ये `डीएसआर`च्या रकमेत वाढ झाल्यामुळे स्मारकाचे काम ७६ कोटींवर गेले.

दरम्यान समितीच्या वतीने नव्याने दोन महिन्यापूर्वी ७६ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. परंतु शासनाने अद्याप कोणताच निर्णय न घेतल्यामुळे काम २०२३ उजाडले तरी ठप्पच आहे. दरम्यान, मुंडे यांच्या औरंगाबादमधील स्मारकाला खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला होता. या जागेवर महिला आणि लहान बालकांच्या उपचारासाठी उभारण्यात येणाऱ्या सुसज्ज ४०० खाटांच्या रुग्णालयास लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.

मराठवाड्यात भाजपचे दोन केंद्रीय मंत्री आहेत तसेच अनेक नेत्यांचे राज्यात, दिल्लीत राजकीय वजन आहे. मराठवाड्यातील अनेक नेते हे गोपीनाथ मुंडे यांचा हात पकडून राजकारणात आले व आज ते मोठ्या पदावर विराजमान झाले आहेत. परंतु राजकीय वजन वापरून या स्मारकाची पायाभरणी करण्यात भाजपचे नेतेमंडळी नापास ठरले आहेत.

क्रांतीचौकजवळील दूध डेअरीच्या सहा एकरपैकी दोन एकर जागेवर गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारले जाणार आहे. या ठिकाणी मुंडे यांचा भव्य पुतळा उभा केला जाणार आहे. याशिवाय त्यांच्याशी संबंधित साहित्याचे प्रदर्शन केले जाणार आहे. त्यांच्या जीवनावर आधारित लघुपट दाखविण्यासाठी शंभर आसन क्षमतेचे अॅम्पी थिएटर देखील उभारले जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com