Bjp Job Fair News : कराड म्हणाले, केंद्राच्या योजनांचा लाभ घ्या, महारोजगार मेळाव्यातून उद्योजक घडवणार ...

Dr.Bhagwat Karad :नोकरी मिळवायची असेल तर पदवीसोबतच कौशल्य व गुणवत्ता महत्वाची आहे.
Bjp Job Fair News
Bjp Job Fair News Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : कौशल्य विकास विभागाअंतर्गत ग्रामीण भागातील युवक- युवतींना कौशल्य विकासाबरोबरच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला महारोजगार मेळावा रोजगार देण्यासोबतच ग्रामीण भागात उद्योजक घडविण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे मत केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड (Dr.Bhagwat Karad) यांनी व्यक्त केले.

वैजापूर येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय' महारोजगार मेळाव्याचे उद्घाटन (Dr.Bhagwat Karad) डॉ.कराड यांच्या हस्ते झाले. (Bjp) यावेळी डॉ.कराड म्हणाले, केंद्र व राज्य शासन रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी कटीबद्ध आहे. ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Bjp Job Fair News
Vaijapur Market Committee News : आमदार बोरनारे यांच्याविरोधात भाजपची महाविकास आघाडीला साथ...

या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासोबतच व्यवसायासाठी आवश्यक प्रशिक्षण, कौशल्य विकासाबाबत मार्गदर्शन, बॅंकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्धतता, यासोबतच महिला बचतगटातील महिलांनाही संधी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. (Marathwada) वैजापूर तालुक्यात महिला बचतगट मोठ्या प्रमाणात आहेत. या बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बँकेच्या मदतीने शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला जात आहे.

ग्रामीण युवकांना रोजगाराची संधी देण्यासाठी महारोजगार मेळावा निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. महारोजगार मेळाव्यासाठी १७०० युवकांनी नोंदणी केली आहे. आजच्या रोजगार मेळाव्यातून काहींना संधी मिळेल तर ज्यांनी नोंदणी केली आहे त्यांना गुणवत्तेच्या आधारे रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. युवकांनी प्रक्रिया उद्योगाकडे वळावे, असे आवाहनही कराड यांनी केले.

मुद्रा कर्ज योजना, स्टार्टअप योजना, यासह केंद्र शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती देत लाभ घ्यावा, असेही कराड यांनी सांगितले. आज नोकरी मिळवायची असेल तर पदवीसोबतच कौशल्य व गुणवत्ता महत्वाची आहे. युवकांनी कौशल्य व गुणवत्तेवर भर देण्याची गरज आहे. कोणताही व्यवसाय करताना त्यासाठीचे नियोजन व कष्ट अत्यंत महत्वाचे आहे.

कोणत्याही उद्योग व्यवसायात कष्ट केले की निश्चित यश मिळते. केंद्र शासनानेही कौशल्य विकासावर भर दिला असल्याचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी सांगितले. तर प्रशांत बंब यांनी युवकांनी शेतीनिगडीत उद्योग तसेच प्रक्रिया उद्योगाकडे वळावे असे आवाहन करताना यासाठी आपले सर्वोतोपरी सहकार्य करण्याची तयारी असल्याचे आश्वासन दिले.

पंचवीस नामांकित कंपन्यांचा सहभाग..

महारोजगार मेळाव्यासाठी जिल्ह्यातील २५ नामांकित उद्योजकांनी सहभाग नोंदविला असून १७६८ रिक्त पदे संकेतस्थळावर अधिासूचित केली आहेत. यामध्ये बीजी-लिन इलेक्ट्रिकल्स, इंडरेस व्हाऊचर इंडिया, फ्रॅक फायबर इंडिया, मराठवाडा ऑटो कॉम्पो, नवभारत फर्टिलायझर्स, श्रेया लाईफ, इंडिको रेमेडिज, धुत ट्रान्समिशन, रुबिकॉन फॉरमुलेशन, सुदर्शन सौर शक्ती, जस्ट डायल, अजित सिड्स, रत्नप्रभा मोटर्स, रेडिअंट इन्डुज, सद्गुरू फुड्स, संजीव ऑटो, फोर्ब्स कंपनी, लंबोदरम् मॉड्युलर, यशस्वी अकॅडमी, एक्सलेंट टिचर, जयेश व्हेंचर, एक्सेल प्लेसमेंट, ग्रामप्रो बिझनेस, लेबर नेट सर्विस, आदी कंपन्यांनी सहभाग नोंदवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com