Latur BJP Politcal News : बसवराज पाटलांच्या भाजप प्रवेशानंतर फडणवीसांच्या लाडक्या आमदाराचं काय होणार?

Bjp Mla Abhimanyu Pawar Ausa Latur Politics : बसवराज पाटलांच्या भाजप प्रवेशाने मराठवाड्यातील राजकारण फिरणार आहे. विशेष करून भाजपमधील नेत्यांचे काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे....
MLA Abhimanyu Pawar News
MLA Abhimanyu Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

जलील पठाण -

Abhimanyu Pawar Bjp Mla Ausa Latur News :

एखाद्या बड्या नेत्याचा पक्षप्रवेश झाला, की वेगवेगळ्या चर्चांचे पेव फुटते. काँग्रेसचे माजी मंत्री बसवराज पाटील यांचा कालच भाजपमध्ये प्रवेश झाला. लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी दोन वेळा प्रतिनिधित्व केले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा भाजपचे विद्यमान आमदार अभिमन्यू पवार यांनी पराभव केला. आता तेच बसवराज पाटील भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर सहाजिकच अभिमन्यू पवारांचे काय? असा प्रश्न त्यांच्या समर्थकांना सतावतो आहे.

बसवराज पाटील यांना पक्षात घेताना दिल्लीतील श्रेष्ठींनी नेमका काय शब्द दिला आहे? किंवा बसवराज यांनी कोणती मागणी केली होती, हे ही लवकरच स्पष्ट होईल. दरम्यान, बसवराज पाटील भाजपमध्ये आल्यामुळे औशाचे विद्यमान आमदार Abhimanyu Pawar यांना लोकसभेसाठी प्रमोशन दिले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. बसवराज पाटील यांच्यासाठी औसा मतदारसंघ मोकळा करण्यासाठी पवार यांना धाराशिवमधून लोकसभेवर पाठवले जाऊ शकते, असेही बोलले जाते.

MLA Abhimanyu Pawar News
Basavaraj Patil and Rashmi Bagal News: माजी मंत्री बसवराज पाटील, रश्मी बागल यांचा फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश!

या चर्चेत किती तथ्य आहे, हे महायुतीचे राज्यातील लोकसभा उमेदवार जाहीर झाल्यावरच कळणार आहे. बसवराज पाटलांची औसा मतदारसंघातील मतदारांशी नाळ जुळलेली आहे. शिवाय त्यांना राज्यातच काम करण्याची इच्छा असल्याने ते आपल्या पारंपरिक मतदारंसघातून लढण्यालाच प्राधान्य देतील, असे बोलले जाते. विधानसभा लढवण्यावर पाटील ठाम राहिले तर मग विद्यमान आमदार अभिमन्यू पवार यांना त्यांच्यासाठी जागा रिकामी करून द्यावी लागेल.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिमन्यू पवार यांना अशावेळी लिफ्ट करून थेट दिल्लीत पाठवले जाऊ शकते. शेजारच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. औसा विधानसभा मतदारसंघात बसवराज पाटील यांनी दहा वर्षे काम केले आहे.

2019 च्या निवडणुकीत त्यांची मते फुटली आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र आता पुन्हा बसवराज पाटलांना भाजपच्या माध्यमातून औसा मतदारसंघातून संधी मिळू शकते. बसवराज पाटलांनी पक्ष प्रवेशासाठी काय मागण्या केल्या होत्या, हे सध्यातरी गुलदस्त्यात आहे. त्यांच्या समर्थकांना तरी त्यांनी औसा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्याच्या अटीवरच भाजपचे कमळ हाती घेतले असेल, असा विश्वास वाटतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'मला कोठे पाठवायचे ते पक्ष ठरवेल'

दरम्यान, अभिमन्यू पवार यांनी बसवराज पाटील यांचा भाजप प्रवेश आणि त्यानंतर बदलणारी राजकीय समीकरणे यावर मनमोकळेपणाने मत व्यक्त केले. माझ्यासाठी प्रथम देश नंतर पक्ष आणि त्यानंतर सत्ता असल्याने देशासाठी आणि माझ्या पक्षासाठी माझी जेथे गरज असेल तेथे जाण्यास मला काहीही संकोच अथवा अडचण नसल्याचे स्पष्ट केले.

बसवराज पाटलांसारखा सुसंस्कृत, चारित्र्य संपन्न नेता मला मार्गदर्शक म्हणून लाभला आहे. याचा मला आनंद आहे. कोणाला कोठे पाठवायचे हे माझा पक्ष ठरवील. मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. आज मी जेथे आहे तिथपर्यंत मला पक्षानेच आणले आहे. मी पक्षाच्या आदेशाचे पालन करणारा कार्यकर्ता आहे, असे म्हणत अभिमन्यू पवार यांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले.

MLA Abhimanyu Pawar News
Manoj Jarange Patil News : 'मी तडफडून मरायला तयार आहे पण...' ; जरांगेंनी फडणवीसांना पुन्हा ललकारले!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com