Babanrao Lonikar : निवडणुकीत कमी मतदान झाले; लोणीकर म्हणाले आठ कोटीचा निधी रद्द करू का ?

BJP MLA Babanrao Lonikar vents anger over receiving fewer votes from a village, questioning whether he should cancel ₹6 crore in development funds : गेल्या विधानसभा निवडणुकीत लोणीकरांचे मताधिक्य घटल्यामुळे बोरगाव येथील सिमेंट रस्त्याच्या भूमीपुजन कार्यक्रमात लोणीकरांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली.
MLA Babanrao Lonikar News
MLA Babanrao Lonikar NewsSarkarnama
Published on
Updated on

Jalna Political News : परतूरचे विद्यमान भाजप आमदार बबनराव लोणीकर आपल्या फटकाळ आणि रोखठोक बोलण्यासाठी ओळखले जातात. कधीकधी त्यांचे हे असे बोलणे अंगलटही येते. आता विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातील ज्या गावातून कमी मतदान झाले, त्या गावात जाऊन लोणीकरांनी गावकऱ्यांना सुनावल्याचा प्रकार समोर आला आहे. मोठं गाव म्हणून तुमच्या गावात निधी दिला, पण तुम्ही विश्वासघात केला. आता आठ कोटींचा निधी रद्द करू का? असे म्हणत लोणीकरांनी चिमटे काढले.

राज्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) परतूर मतदारसंघातून निवडून आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ए.जे. बोराडे यांनी त्यांना चांगली टक्कर दिली. त्यामुळे लोणीकर यांचा अवघ्या 4740 मतांनी विजय झाला. पाचवेळा निवडून आल्यामुळे त्यांची या मतदारसंघावर चांगली पकड आहे. 2014 ते 2024 दरम्यान ते सलग तीनवेळा निवडून आलेले आहेत. पाणी पुरवठा मंत्री म्हणूनही त्यांनी 2014 च्या देवेंद्र फडणवीस मंत्रीमंडळात काम केले. मोठ्या प्रमाणात मतदारसंघात निधी आणि विकासकामे केल्याचा त्यांचा दावा आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत लोणीकरांचे मताधिक्य घटल्यामुळे बोरगाव येथील सिमेंट रस्त्याच्या भूमीपुजन कार्यक्रमात लोणीकरांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली. (BJP) मोठं गाव म्हणून हे मी माझ्याकडे घेतलं होतं. आधी हे गाव माझ्या मतदारसंघात नव्हतं. पण ते आल्यापासून जो काही निधी आणि विकासकामे केली ती मीच केली. पण या निवडणुकीत तुम्ही दुसऱ्या पक्षाकडे गेले. गावातले पोरं 'उबाठा'कडे उधळले.

MLA Babanrao Lonikar News
BJP Babanrao Lonikar allegation : 'तो' घोटाळा 100 कोटींच्या पुढचा; आमदार लोणीकर म्हणाले, 'भ्रष्ट अधिकाऱ्यांना तुरुंगात डांबण्याची वेळ'

ज्या पक्षाचे नेते कधी तुमच्या सुख-दुःखाला येत नाही, त्यांच्या मागे तुम्ही गेलात. मग आता गावाला दिलेला कोटीचा निधी रद्द करू का? पाच वर्षात एकदा कमळ निशाणीवर मी तुम्हाला फुली मागतो, ती तुम्ही यावेळी दिली नाही. जे निवडणुकीत तुमच्याकडे आले होते, ते आता दिसतात का? पण तुम्ही कसेही वागले तरी मी तुमच्याशी वाईट वागणार नाही. 8 कोटीचा रस्ता गावात होणारच आहे.

MLA Babanrao Lonikar News
Babanrao Lonikar-Raosaheb Danve : मी अन् रावसाहेब दानवेंनी ठरवलं तर जालना महापालिका ताब्यात घेऊ शकतो! लोणीकरांचा दावा..

यावेळी नाही, पण पुढच्या वेळी दगाफटका केला तर मग मलाही विचार करावा लागेल, अशा इशारच बबनराव लोणीकर यांनी गावकऱ्यांना दिला. पुर्वी गावात बलुतेदार पद्धत होती, तसं पाच वर्षात एका फुलीची बलुतेदारी मी मागतो, ती ही तुम्ही दिली नाही. आतापर्यंत गावाला जे मिळालं ते मीच दिलं, इथून पुढेही मीच देणार आहे, असे म्हणत लोणीकरांनी गावकऱ्यांना चागलेच सुनावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com