BJP News: नड्डांची सभा फ्लाॅप, भाषण सुरू असतांना लोक उठून गेले..

Aurangabad : दुपारी चारपासून लोक सभास्थळी आणण्यात आल्यामुळे नेमकं नड्डाचं भाषण सुरू असतांनाच लोक उठून जावू लागले.
Bjp President Nadda Rally News, Aurangabad
Bjp President Nadda Rally News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Aurangabad Political : औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठीची पहिली विराट जाहीर सभा असा दावा करणाऱ्या भाजपचा (Bjp)आज चांगलाच फ्लाॅप शो झाला. राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे भाषण सुरू असतांनाच लोक खुर्च्यावरून उठून गेले.

Bjp President Nadda Rally News, Aurangabad
Aurangabad : भाजपचे मिशन लोकसभा अन् फडणवीसांना ताप..

लोक उठत असतांना प्रसार माध्यमांचे कॅमेरे ते टिपण्यासाठी वळताच व्यासपीठावरील नेत्यांचे चेहरे पडले. विरोधी पक्षाने यावरून आता भाजपला डिवचण्यास सुरूवात केली आहे. (Aurangabad) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रिकाम्या खुर्च्यांचा फोटो ट्विट करत `अहो नड्डा पहा हा खड्डा`, असा टोला लगावला आहे. (Marathwada)

एकंदरित भाजपच्या शक्तीप्रदर्शनाचा फ्लाॅप शो झाल्याने स्थानिक नेत्यांची चांगलीच गोची झाली. औरंगाबादेतील सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार नाही हे समजल्यावर गर्दी पांगायला सुरुवात झाली होती. दुपारी चार वाजेपासून लोक सभास्थळी आणण्यात आल्यामुळे नेमकं नड्डाचं भाषण सुरू असतांनाच लोक उठून जावू लागले.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, राष्ट्रीय सचिव पकंजा मुंडे यांचे भाषण देखील रंगले नाही. त्याचा परिणाम लोक उठून जाण्यात झाला. राष्ट्रीय अध्यक्षांची पहिलीच मराठवाड्यातील सभा फसल्यामुळे स्थानिक नेत्यांवर त्याचे खापर फोडले जाण्याच शक्यता आहे.

औरंगाबाद लोकसभेवर दावा सांगणाऱ्या भाजपसाठी हा मोठा फटका असणार आहे. यातून भाजपच्या शहर आणि जिल्ह्यातील मर्यादा देखील उघड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com