Bageshwar Dham Sarkar News : बागेश्वर धामच्या दरबारात भाजपच्या मंत्री, आमदारांची हजेरी...

Dr. Bhagwat Karad News :महाराजांची कृपादृष्टी व्हावी, आपली `परची` निघावी, यासाठी नेत्यांची बाबांच्या दरबारात हजेरी.
Bageshwar Dham Sarkar News
Bageshwar Dham Sarkar NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada BJP News : सनातन धर्म आणि हिंदुत्वाची प्रखर भूमिका मांडणारे बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या दरबारात भाजपचे मंत्री दररोज हजेरी लावत आहेत. (bageshwar dham News) केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड संयोजक असलेल्या या रामकथा, प्रवचन आणि दरबारामध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्यातील गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, पालकमंत्री संदीपान भुमरे, माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांच्यासह शिंदे गटाचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल नियमित हजेरी लावत आहेत.

Bageshwar Dham Sarkar News
MP Imtiaz Jaleel News : आदर्शच्या कर्जदारांची जप्त मालमत्ता खरेदीचा निर्णय सहकार आयुक्त घेणार का ?..

संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगरात ऐन दिवाळीत आणि लोकसभा निवडणुकीच्या सहा महिने आधी आयोजित कार्यक्रमाकडे राजकीय इव्हेंट म्हणूनही बघितले जात आहे. (BJP) धीरेंद्र शास्त्री यांचा दरबार त्यांच्या ` परची` (चिठ्ठी-भविष्यवाणी) साठी ओळखला जातो. (Marathwada) सध्याची राज्य आणि देशातील राजकीय परिस्थिती पाहता प्रत्येकाला येणाऱ्या निवडणुकीत आपले काय होणार? उमेदवारी मिळणार का? मिळाली तर निवडून येणार का? याची चिंता सतावत आहे.

अशावेळी बागेश्वर धाम यांच्या दरबारात आपली `परची` निघते का? यासाठीही सत्ताधारी मंत्री, आमदारांनी गर्दी केल्याची चर्चा आहे. डाॅ. भागवत कराड (Dr.Bhagwat Karad) हे स्वतः प्रत्येकाची ओळख धीरेंद्र शास्त्री यांच्याशी करून देत आहेत. कराड यांच्यासाठी बागेश्वर धामचा दरबार आणि रामकथेचे आयोजन हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनला होता. धीरेंद्र शास्त्री यांच्या रामकथेचे आयोजन करण्यासाठी गृहनिर्माणमंत्री अतुल सावे हेही इच्छुक होते. दोघांनीही मध्य प्रदेशात जाऊन धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेऊन तारीख मिळवण्याचा प्रयत्न केला होता.

त्यात कराडांनी बाजी मारली आणि महिनाभरात सगळी तयारी करून कथेचे आयोजन केले. सनातन धर्म आणि प्रखर हिंदुत्ववादी विचार धीरेंद्र शास्त्री महाराज आपल्या कथेतून मांडत असल्याने याचा फायदा लोकसभा निवडणुकीत उठवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. यानिमित्ताने अतुल सावे, हरिभाऊ बागडे, हर्षवर्धन कराड, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल यांच्यासह भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील इतर इच्छुकांनीही या दरबारात हजेरी लावत आहे. महाराजांची कृपादृष्टी व्हावी, आपली परची निघावी, यासाठी नेत्यांनी बाबांच्या दरबारात हजेरी लावल्याची चर्चाही या निमित्ताने रंगताना दिसते आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com