Bjp News : कराडांच्या मुलाकडे शिवजयंतीचे अध्यक्षपद अन् मिरवणूकीची परंपरा खंडीत..

Marathwada : सर्वच राजकीय पक्षांनी यंदा जिल्हा शिवजयंती उत्सव समितीकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते.
Harshvardhan Karad News, Aurangabad
Harshvardhan Karad News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Aurangabad : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती काल मोठ्या उत्साहात देशभरात साजरी करण्यात आली. अगदी आग्र्याच्या किल्ल्यावर पहिल्यांदाज शिवजयंती साजरी झाल्याने त्याची देखील चर्चा होत आहे. (Aurangabad) औरंगाबादेत शिवजंयतीचा उत्साह होता, पण राजकारणातील कुरघोडीमुळे ५३ वर्षापासून सुरू असलेली शिवजंयती जिल्हा उत्सव समितीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मिरवणूकीची परंपरा मात्र खंडीत झाली.

Harshvardhan Karad News, Aurangabad
Sanjay Shirsat News : जे जे शिवसेनेचे ते आता आमचे ; शिवसेना भवनावर दावा..

शहराचे ग्राम दैवत असलेल्या संस्थान गणपती मंदिरापासून दरवर्षी शिवजयंती मिरवणूकीला सुरुवात होत असते. (Dr.Bhagwat Karad) यंदा मात्र ही मिरवणूक निघू शकली नाही. यामागे अनेक कारणे दिली असली तरी त्यामागे राजकीय कारण असल्याची चर्चा होत आहे. (Bjp) शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्षपद दरवर्षी सर्वच राजकीय पक्षांच्या वाट्याला येते.

यंदा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांचे चिरंजीव हर्षवर्धन कराड यांना हा मान देण्यात आला होता. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून हर्षवर्धन हे शिवजंयती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या तयारीत होते. परंतु कराड यांच्या मुलाकडे आलेले हे अध्यक्षपद आणि त्या माध्यमातून आपले राजकीय वजन वाढवण्याचा किंवा राजकारणात अधिक सक्रिय होण्याचा त्यांचा प्रयत्न काहींना खुपला.

विशेषतः भाजपमधीलच काही स्थानिक पदाधिकारी, नेत्यांना तो हाणून पाडायचा होता. त्यामुळे सुरुवातीपासूनच सर्वच राजकीय पक्षांनी यंदा जिल्हा शिवजयंती उत्सव समितीकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते. त्यातच विनोद पाटील यांनी आपल्या प्रतिष्ठाणच्या वतीने आग्रा येथील किल्यात शिवजयंती साजरी करण्याचे ठरवल्यामुळे शहरातील भाजपसह सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तिकडे गेले होते. त्यामुळे शहरातील शिवजयंतीच्या उत्साहावर थोडा परिणाम झाला.

शहरातील काही भागांमध्ये मिरवणूका निघाल्या, परंतु मुख्य आकर्षण असणारी जिल्हा उत्सव समितीची मिरवणूक मात्र निघाली नाही. त्यामुळे शिवप्रेमींचा हिरमोड झाला. सर्वानी मिळून हा निर्णय घेतल्याचे उत्सव समितीकडून सांगितले जात असले तरी यामागे हर्षवर्धन कराड यांच्याकडे असलेले अध्यक्षपद, त्यामुळे राजकीय पक्षांनी काढून घेतलेले अंग यामुळेच गेल्या ५३ वर्षांच्या मिरवणूकीची परंपरा यंदा खंडीत झाल्याचे बोलले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com