
Chhatrapati Sambhajinagar : राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर केले. त्यामुळे तमाम हिंदूंच्या भावना आनंदाने उत्साहीत झाल्या, प्रफुल्लित झाल्या. परंतु काही धर्मांध जातीवादी संघटना ह्या औरंगजेब व निजामाचा वारसा चालवत आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले, अशी टीका भाजपचे शहराध्यक्ष शिरीश बोराळकर (Shirish Boralkar) यांनी केली आहे.
शहराच्या नामांतराविरोधात साखळी उपोषण करणाऱ्या खासदार इम्तियाज जलील यांच्यावर टीका करतांना या नामांतराने त्यांचा तिळपापड झाल्याचा टोला देखील त्यांनी लगावला. (Bjp) बोराळकर म्हणाले, (Aimim) एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर केल्याने संताप झाला आहे.
ज्या जुलमी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांना हालहाल करून मारले , त्यांचा अतोनात छळ केला त्या औरंगजेबाचे नाव शहराला होते. मागील ३५ वर्षांपासून सर्व सामाजिक संघटना व जनभावनेचा आदर राखून शिंदे- फडणवीस सरकारने ही मागणी पूर्ण केली. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर केले, पण या विरोधात एमआयएम ह्या जातीवादी संघटनेचे कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत.
एवढेच नाही, तर उपोषणस्थळी क्रूरकर्मा हिंदूंच्या कत्तली, छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून मारणाऱ्या औरंगजेबाचे पोस्टर झळकवले. यातून एमआयएम व त्या पक्षाचे कार्यकर्ते खऱ्या अर्थाने औरंगजेबाचा वारसा पुढे चालवत आहेत, हेच दिसून येते. या पद्धतीने त्या ठिकाणी वातावरण निर्मिती करण्यात आल्यामुळे तमाम हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत.
ज्या औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद करून ठेवले, त्यांचा छळ केला त्या धर्मांधाचे नाव शहराला होते. ते बदलून शहराचे नामकरण केले तर यांना पोटदुखी का होतेय? हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी हे जाणीवपूर्वक केले जात असल्याचा आरोप करत या प्रवृत्तीचा भाजप निषेध करते, असेही बोराळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.