Pankaja Munde Pollitical Breaking : पंकजा मुंडेंना थेट दिल्लीतून सांगावा; 'राजकीय ब्रेक' घेण्याच्या निर्णयाचा फेरविचार करा !

BJP Political News : सध्याच्या राजकारणाचा कंटाळा आल्यामुळे दोन महिने राजकारणातून सुट्टी घेत असल्याचं जाहीर केले होते.
Pankaja Munde News :
Pankaja Munde News :Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना पक्षात सातत्यानं डावललं जात असल्याचा आरोप केला जातो. याचवेळी त्या भाजपमध्ये नाराज असल्याच्याही जोरदार चर्चा आहे. तसेच लवकरच त्या भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याचंही बोललं जात होतं. पण काही दिवसांपूर्वी अचानक त्यांनी "मला राजकारणातून ब्रेक हवा आहे. सध्याच्या राजकारणाचा कंटाळा आल्यामुळे दोन महिने राजकारणातून सुट्टी घेत असल्याचं जाहीर केले होते. या त्यांच्या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यांच्या निर्णयावर अनेक तर्कवितर्क लढवले जात असतानाच दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून मुंडे यांच्यासाठी महत्वपूर्ण आदेश दिले असल्याची माहिती समोर येत आहे.

दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पंकजा मुंडेंनी काही दिवसांपूर्वी राजकारणातून दोन महिन्यांचा ब्रेक घेत असल्याच्या निर्णयाची गंभीर दखल घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीतून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुंडे यांना त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करण्याचे निर्देश दिल्याची चर्चा आहे.

Pankaja Munde News :
Dhananjay Munde Big Announcement : नव्या कृषिमंत्र्यांचा धडाकेबाज निर्णय ; बोगस बियाणे, खते विक्रेत्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार !

भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली असून ४०० प्लसचा नारा दिला आहे. तसेच महाराष्ट्रात 'मिशन ४५' निश्चित करण्यात आलं आहे. त्याच धर्तीवर भाजप राज्य राज्यात अॅक्टिव्ह झाली असून त्या अनुषंगाने बैठके, दौरे , मेळावे यांना वेग आला आहे. तसेच लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच दिल्लीत 'एनडीए'तील घटक पक्षांची बैठक बोलावली होती. आता पंकजा मुंडे यांना देखील दिल्लीतील भाजपच्या नेत्यांनी आदेश दिले आहेत.

राष्ट्रवादीचा अजित पवार(Ajit Pawar) गट भाजपसोबत सत्तेत आल्यानंतर भाजपमध्ये आधीच नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांची मोठी अडचण झाली आहे. युती सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सामील करून घेण्याचा निर्णय त्यांना आवडला नसल्याची जोरदार चर्चा आहे. कारण अजित पवार गटात पंकजा मुंडेंचे राजकीय विरोधक धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांचाही समावेश आहे. आता हे तीनही गट एकत्रित लढल्यानंतर पंकजा मुंडे यांचे राजकीय वाटचाल आणखी खडतर झाली आहे.

Pankaja Munde News :
Health Department: राज्यातील ८०० कंत्राटी परिचारिकांना सरकारचं मोठं गिफ्ट; आरोग्य सेवेत कायम करणार

पंकजा मुंडे यांनी दोन महिने राजकारणातून ब्रेक घेण्याच्या निर्णयाचा तात्काळ फेरविचार करावा असे निर्देश भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी दिले असल्याची माहिती आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता तसेच मध्य प्रदेशमध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता पंकजा मुंडेंना हे निर्देश देण्यात आल्याचं सूत्रांची माहिती आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com