Prakash Ambedkar News : भाजपकडून विखे पाटील तर काॅंग्रेस थोरातांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे आणणार..

Congress : माणिकराव , पृथ्वीराज यांनी राष्ट्रवादीसोबतची युती तोडून वंचितशी जुळवण्याची बोलणी झाली. परंतु हायकमांडने नकार दिला
Adv. Prakash Ambedkar News, Aurangabad
Adv. Prakash Ambedkar News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : राज्यात भाजप आणि काॅंग्रेसकडून वेगळी खेळी सूरू आहे. भाजप राधाकृष्ण विखे पाटील यांना तर काॅंग्रेस बाळासाहेब थोरातांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करत असल्याचा दावा वंचितचे (Vanchit Aghadi) सर्वेसर्वा प्रकाश आबंडेकर यांनी औरंगाबादेत पत्रकारांशी बोलतांना केला.

Adv. Prakash Ambedkar News, Aurangabad
Ambadas Danve News: तीस-तीस घोटाळ्यात दानवेंचे नाव ; पण ते म्हणतात, तो मी नव्हे..

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर आमची शिवसेनेशी युती राहणार आहे. (Bjp) लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा केली जाईल. (Prakash Ambedkar) युती संदर्भातील संपुर्ण बोलणी झाली आहे, लवकरच पिक्चर समोर येईल, असेही ते म्हणाले. आगामी मुंबई मनपाच्या निवडणुका लक्षात घेता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती जवळपास पूर्ण झालेली आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुका आम्ही सोबत लढणार आहोत. जागा वाटप निश्चित झाले असून ही युती लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत देखील कायम राहणार आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आमच्यासोबत आले तरी आमची हरकत नाही, परंतु या दोन्ही पक्षांना सोबत घ्यायचे की नाही हे ठाकरे ठरवतील. काॅंग्रेस नेत्यांवर टीका करतांना आंबेडकर म्हणाले, माणिकराव ठाकरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीसोबतची युती तोडून वंचितशी जुळवण्याची बोलणी झाली.

परंतु काँग्रेस हायकमांडने नकार दिला, त्यानंतर त्यांनी पदाची लालसा दाखवत तुम्ही फक्त दलितांसाठी जागा मागा. ओबीसी गरीब मराठा यांच्यासाठी जागा न मागण्याची अट घातली त्यामुळे मी दूर झालो. भाजप आणि काॅंग्रेसने मुख्यमंत्री पदाचे उमेदवार ठरवले असून भाजपचा आगामी मुख्यमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांना समोर आणण्यात येणार तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात असे दोन चेहरे समोर येणार असल्याचा दावा देखील आंबेडकरांनी केला.

शिक्षक व पदवीधर मतदार संघात विविध पक्षातील अंतर्गत बंडळीचा वांचीतला फायदा होणार असल्याने या दोन्ही ठिकाणी आम्ही बाजी मारणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. या मतदानात ग्रामीण मतदाराचा जास्त सहभाग राहत नाही. तो मतदार आम्ही वळवण्याचा प्रयत्न करतोय त्याचाही फायदा आम्हाला मिळणार असल्याचा दावा आंबेडकरांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com