CM Mamata Banerjee News : खेला होबे, भाजप डिसेंबरमध्येच लोकसभा निवडणूक घेणार..

Loksabha News : भाजपचे दिल्लीतील नेतृत्व धक्कातंत्रासाठी ओळखले जाते.
CM Mamata Banerjee News
CM Mamata Banerjee NewsSarkarnama

Maharashtra Political News : लोकसभेच्या निवडणुका २०२४ च्या एप्रिल महिन्यात होणे अपेक्षित आहेत. परंतु भाजप मुदपुर्व निवडणुका घेण्याच्या तयारीत असल्याची शक्यता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Loksabha Election News) यांनी व्यक्त केली आहे. विरोधकांना प्रचाराची संधीही मिळू नये यासाठी सर्व हेलीकाॅप्टर देखील भाजपने बुक केल्याचा दावा देखील बॅनर्जी यांनी केला.

CM Mamata Banerjee News
Amarsinh Pandit On Farmers : सरकारी हस्तक्षेप थांबवा, शेतकऱ्यावर हात पसरण्याची वेळ येणार नाही..

यापुर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, तामिळनाडूचे स्टॅलिन यांनी देखील मुदपुर्व निवडणुकीची शक्यता वर्तवली होती. आता ममतांच्या (CM Mamata Banerjee) दाव्याने या चर्चेला पुष्टी मिळाली आहे. देशपातळीवर भाजप विरोधात एकवटलेल्या `इंडिया`ची बैठक येत्या ३१ आॅगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे.

उद्धव ठाकरे आयोजक असलेल्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेते या बैठकीसाठी झटत आहेत. (Narendra Modi) असे असतांना भाजप विरोधी आघाडीला संधीच मिळू नये अशा प्रयत्नात असल्याचे बोलले जाते. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही काही दिवसांपुर्वी मुदतपूर्व निवडणुकी संदर्भात भाकित केले होते. (Maharashtra) देशातील तीन प्रमुख राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी डिसेंबरमध्ये भाजप लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका घेऊ शकते, असा दावा केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

भाजपचे दिल्लीत नेतृत्व धक्कातंत्रासाठी ओळखले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या रणनितीचा थांगपत्ताही ते कोणाला लागू देत नाहीत. त्यामुळे नितीश कुमार, स्टॅलिन आणि आता ममता बॅनर्जी या तीन मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दाव्यानूसार खरच डिसेंबरमध्ये लोकसभा निवडणूक होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मुंबईत होणाऱ्या `इंडिया`, च्या बैठकीत या विषयावर सखोल चर्चा होऊ शकते. भाजपने मुदतपूर्व लोकसभा निवडणुकीची घोषणा केली तर राजकीय पक्ष आणि प्रशासनाचा गोंधळ उडणार आहे. भाजपविरोधात देशभरातील पक्ष एकवटत असल्यामुळे त्यांना संधीच मिळू नये, असा प्रयत्न मुदतपूर्व निवडणूक जाहीर करण्यामागे असू शकतो, अशीही चर्चा होत आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com