Sharad Pawar Criticized BJP : फाळणीच्या पत्रकावरून कटुता वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न शरद पवारांचा घणाघात

Sharad Pawar News : याबाबत भाजपने काढलेलं परिपत्रकच शरद पवारांनी वाचून दाखवलं आहे.
Sharad Pawar Criticized BJP
Sharad Pawar Criticized BJPSarkarnama
Published on
Updated on

Chatrapati SambhajiNagar : "मोदी सरकारने परिपत्रक काढून, १४ ऑगस्ट हा फाळणी दिवस साजरा करण्याचे आवाहन केलं आहे. यातून दोन समाजात, धर्मात कटुता निर्माण करण्याचा भाजप प्रयत्न करत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर केला. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले, १९४७ मध्ये देश स्वातंत्र्य झाल्यानंतर देशाचे दोन भाग झाले, फाळणीच्या वेळी देशात दोन धर्मात मोठा हिंसाचार झाला. एकमेकांवर अत्याचार झाले, अन्याय झाले, या घटनेमुळे दोन समाजात कटुता निर्माण झाली. विशेषत: उत्तरेकडे ही कटूता अनेक वर्षे 'टिकून राहिली, ती कटुता, ते दु:खातून आता कुठे देश विसरायला लागला आहे. पण १० तारखेच्या सर्क्युलरमध्ये भाजपने या फाळणीचा स्मरण दिवस साजरा करण्याचे आवाहन केलं आहे.

Sharad Pawar Criticized BJP
Sharad Pawar Live : शरद पवारांनी भाजपविरोधात थोपटले दंड; फाळणीपासून मणिपूरपर्यंत सगळंच काढलं

फाळणीचे स्मरण करण्यासाठी भाजपने काढलेल्या सर्क्युलरमध्ये ठिकठिकाणी फाळणीचे प्रदर्शन भरवण्याचे आवाहन केले आहे. फाळणीच्या वेळी झालेल्या घटनांचे चित्र प्रदर्शन भरवा, त्याठिकाणी स्वातंत्र्यसेनानींनी निमंत्रित करा, फाळणीचा काळ अनुभवलेल्या लोकांना निमंत्रित करा, ते करत असताना तिथे मिडियालाही बोलवा आणि त्यांच्यासमोर हा हॉरर इतिहास मांडा. या प्रदर्शनासाठी एक विशिष्ट कालवधी ठरवा, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा फाळणीचा इतिहास कसा जाईल याची काळजी घ्या, असेही आदेश या सर्क्युलरमध्ये देण्यात आल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. याचाच अर्थ भाजप या देशात दोन समाजात कटुता वाढवण्याचा, अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

यापुढे आम्ही महाविकास आघाडी आणि 'इंडिया'च्या पुढील बैठकीय या विषय मांडू आणि त्याचं गार्भीर्य लक्षात आणून देऊ. तसेच, भाजपशासित राज्यामंध्ये जाऊनही आम्ही तिथेही हा विषय मांडू, असंही शरद पवारांनी नमुद केलं. आज ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे. तो भाजप आणि त्यांच्या राज्यकर्त्यांनी देशातील सर्व समाजात एकवाक्यता ठेवणे अपेक्षित होते. पण त्यांनी समाजात, धर्मात भाषिकांमध्ये कटुता कशी वाढेल अशी भूमिका घेत आहेत.

Sharad Pawar Criticized BJP
Sharad Pawar News : शरद पवारांनी मारले एका दगडात दोन पक्षी, म्हणाले, ''फडणवीसांचा आदर्श घेत मोदींनी...''

बिहार कर्नाटकसह देशातील काही विरोधी पक्षांनी 'इंडिया'च्या माध्यमातून सामुहिकरित्या मोदी सरकारविरोधात जनमत कसे जमवण्यासाठी आणि त्यांना पर्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी येत्या ३१ ऑगस्टला मुंबईत इंडियाची बैठक होत आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईत इंडिया'ची सभा घेतली जाईल. असही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com