Pankaja Munde Shivshakti Rally : पंकजा मुंडेंच्या यात्रेकडे भाजपची पाठ, पण सामान्यांची भक्कम साथ..

Marathwada Political News : कोऱ्या करकरीत नोटांचा हार घालत पंकजा यांचे स्वागत रासपच्या वतीने करण्यात आले.
Pankaja Munde News
Pankaja Munde NewsSarkarnama
Published on
Updated on

BJP Political News : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दोन महिन्याच्या राजकीय ब्रेकनंतर `शिवशक्ती`, परिक्रमेच्या माध्यमातून पुनरागमन केले. (Pankaja Munde In Action News) शिवशक्ती आणि नारीशक्तीचा नारा देत त्यांनी राज्यातील दहा जिल्ह्यांमधून काढलेल्या परिक्रमा यात्रेकडे भाजपच्या नेत्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. पक्षाने पाठ फिरवली असली तरी सामान्य कार्यकर्ते मात्र अजूनही पंकजा यांच्यासोबत असल्याचे चित्र त्यांच्या परिक्रमा यात्रेला मिळत असलेल्या प्रतिसादावरून दिसत आहे.

Pankaja Munde News
Ambadas Danve On Sandipan Bhumre : तुमची अगरबत्ती मध्येच कुठे ओवाळतायं ? मराठा समाज तुम्हालाच घरी बसवणार; भुमरेंना दानवेंचा टोला..

आपली ही यात्र राजकारणविरहित फक्त जनतेशी संवाद साधण्यासाठी असल्याचे पंकजा यांनी स्पष्ट केले होते. (BJP) असे असले तरी परळी विधानसभा मतदारसंघातील पराभव, तिसरा उमेदवार दिला असता तर मी हरले नसते, तसेच राज्यातील राजकीय घडामोडीवर त्या भाष्य करतांना दिसत आहेत. (Marathwada) माहूरगड येथे रेणुकादेवीचे दर्शन घेऊन त्यांनतर छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ येथील घृष्णेश्वराच्या दर्शनाने पंकजा यांनी आपल्या परिक्रमेला सुरूवात केली होती.

संभाजीनगरात निवडक भाजप पदाधिकाऱ्यांनी पंकजा (Pankaja Munde) यांचे स्वागत केले होते. जिल्ह्याला राज्याचे तीन तर केंद्राचे दोन असे पाच मंत्री लाभलेले असतांना पंकजा यांच्या परिक्रमेची दखल मात्र त्यांच्या स्वपक्षाच्या आणि सत्तेत असलेल्या शिंदेच्या मंत्र्यांनीही घेतली नाही. परंतु पुढे नाशिक जिल्ह्यात पंकजा यांचे जोरदार स्वागत झाले. एवढे की या स्वागताने पंकजा भारावल्या, त्यांना अश्रू अनावर झाले.

त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर पंकजा आता फलटण तालुक्यातील जावलीत दाखल झाल्या आहेत. पकंजा यांचे भाऊ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांचे वर्चस्व असलेला हा भाग. त्यामुळे इथे पंकजा यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत होणे अपेक्षितच होते. कोऱ्या करकरीत नोटांचा हार घालत पंकजा यांचे स्वागत रासपच्या वतीने करण्यात आले. या स्वागताबद्दल जानकर यांनी देखील भावना व्यक्त केल्या.

भगिनी पंकजाताई मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा जावली, ता. फलटण येथे आली असता राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने नोटांचा हार घालून सत्कार करण्यात आला. भावाबरोबर बहिणीलाही नोटांचा हार घालणारे दानशूर कार्यकर्ते जगातील एकमेव पक्षाकडे आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांना सलाम, अशा शब्दात जानकर यांनी आनंद व्यक्त केला. त्यामुळे एकीकडे पंकजा मुंडे यांच्या यात्रेकडे त्यांच्याच पक्षाने पाठ फिरवल्याचे चित्र तर दुसरीकडे सामान्यांची मात्र त्यांना भक्कम साथ मिळत असल्याचे दिसते.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com