जिंतूरमध्ये बोर्डीकर- भांबळे समर्थक भिडले ; तुफान दगडफेक, पोलिसांचा लाठीमार

जिंतूर शहरातील जिल्हा परिषद प्रशालेच्या मतदान केंद्रावर जिंतूर औद्योगिक वसाहतीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मतदान प्रक्रिया सुरू होती. (Bjp-Ncp Parbhani)
Bjp-Ncp Supporters Clashes in Jintur
Bjp-Ncp Supporters Clashes in JinturSarkarnama

परभणी : जिल्ह्यातील भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील धुसफूस नवी नाही, यातून अनेकदा या दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये खटके उडत असतात. (Bjp) औद्योगिक वसाहत संचालक मंडळाच्या निवडणुकीत जिंतूर येथील एका मतदान केंद्रावर आज रविवार ता.२७) रोजी भाजपचे नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि राष्ट्रवादीचे (Ncp) माजी आमदार विजय भांबळे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. (Marthwada)

किरकोळ कारणावरून दोघांचे समर्थक एकमेकांना भिडल्याने जिंतूरमध्ये तणावाचे वातावरण आहे. दोन्ही पक्षाच्या समर्थकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला. या पार्श्वभूमीवर जिंतूरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जिंतूर शहरातील जिल्हा परिषद प्रशालेच्या मतदान केंद्रावर जिंतूर औद्योगिक वसाहतीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मतदान प्रक्रिया सुरू होती. मतदान प्रक्रियेसाठी भाजप नेते रामप्रसाद बोर्डीकर व माजी आमदार विजय भांबळे हे स्वतः उपस्थित होते.

यावेळी दोन्ही गट मतदान केंद्राच्या बाहेर तळ ठोकून असतांना मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या आत का आलात? म्हणून बोर्डीकर गटाच्या एकावर भांबळे यांनी आक्षेप घेतला. त्यावेळी बोर्डीकर व भांबळे यांच्यात वादविवाद सुरू झाला. वाद अधिकच वाढत गेला आणि दोन्ही नेत्यांचे समर्थक एकमेकांच्या दिशेने धावून गेले.

हा जमाव अचानक आक्रमक झाला आणि दोन्ही बाजूंनी तुफान दगडफेक सुरू झाली. या प्रकाराने मतदान केंद्राच्या परिसरात पळापळ सुरू होऊन दहशत निर्माण झाली. घटनेची माहिती कळता पोलिसांची अधिक कुमक या ठिकाणी पाठविण्यात आली. पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना घटनास्थळावरून निघून जाण्याचे आवाहन केले.

Bjp-Ncp Supporters Clashes in Jintur
दिशा सॅलियन प्रकरणात मोठा खुलासा; नारायण राणेंसह नितेश यांच्यावरही गुन्हा दाखल

परंतू वाद अधिकच वाढल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना व अन्य वरिष्ठ अधिकारी जिंतूर शहरात दाखल झाले. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com