BRS Meeting Assembly Election: बीआरएस महाराष्ट्रातील २८८ विधानसभेच्या जागा लढवण्याच्या तयारीत..

KCR : २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये दीड हजारापेक्षा जास्त प्रमुख कार्यकर्ते पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करणार.
BRS Meeting Fof Assembly Election News
BRS Meeting Fof Assembly Election NewsSarkarnama

Maharashtra News: नांदेड मार्गे मराठवाड्यात दाखल झालेल्या तेलंगणातील भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस (BRS Meeting For Assembly Election News) या पक्षाने महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी हैदराबादेत मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यासह महाराष्ट्रातील बीआरएसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभेच्या जागा लढवण्यावर चर्चा झाली.

BRS Meeting Fof Assembly Election News
Sambhaji patil Nilangekar News : निलंगेकरांचा' नाद करायचा नाही, लुडबुड करणाऱ्यांना इशारा..

शिवाय या प्रत्येक मतदारसंघात बीआरएसचे तेलंगणातील काम पोहचवण्यासाठी प्रचार मोहित हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Maharashtra) यासाठी प्रत्येक मतदारसंघासाठी पाच जणांची कोअर कमिटी देखील तयार करण्यात आली आहे. (K.Chandrashekhar Rao) केसीआर यांच्या बैठकीत महाराष्ट्रातील सर्व माजी खासदार, माजी आमदार विविध पक्षाच्या राजकीय पदावरील मोठे नेते, शेतकरी संघटनेचे मोठे नेते उपस्थित होते.

तेलंगणा भवन येथे पार पडलेल्या या बैठकीत महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येकी पाच जणांची कोअर कमिटी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. (Harshvardhan Jadhav) या कमिटीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये भारत राष्ट्र समितीची प्रचार वाहन प्रत्येक गावात फिरवले जाणार आहे. तसेच भारत राष्ट्र समितीची किसान आघाडी, महिला, एससी, एसटी, अल्पसंख्यांक, कामगार, युवक, विद्यार्थी, ओबीसी अशा विविध आघाडी व त्यांच्या समित्या गठीत करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये हे अभियान एक महिना चालेल. दहा लाख किलोमीटर प्रवास, २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये दीड हजारापेक्षा जास्त प्रमुख कार्यकर्ते पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे केसीआर यांनी बैठकीत सांगितले. सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचे दोन दिवस प्रशिक्षण शिबीर हैदराबाद येथे भरवण्यात येणार असून प्रशिक्षण झाल्यानंतर हे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेतील.

त्यानंतर नागपूर येथील दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये भारत राष्ट्र समिती पक्ष वाढवण्याचे कार्य सुरू करतील, असेही केसीआर यांनी स्पष्ट केले. आज पर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात मोठा पक्ष वाढवण्याचा कार्यक्रम भारत राष्ट्र समितीच्या वतीने होणार आहे. दोन कोटी शेतकरी बांधवांसह विविध क्षेत्रातील सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांना पक्षात घेण्यात येणार असल्याचे चंद्रशेखर राव यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com