BRS News : राष्ट्रवादीतले बंड पवार कुटुंबाने ठरवून केले, जयंत पाटील शकुनीमामा..

Sharad Pawar : शरद पवार व अजित पवार हे सगळे एका माळेचेच मणी.
BRS News, Marathwada
BRS News, MarathwadaSarkarnama

Marathwada : अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत झालेले बंड हे थोतांड आहे. पवार कुटुंबियांनी ठरवून केलेले हे बंड असून या सगळ्या नाट्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शकुनीमामाची भूमिका वठवली असल्याचा गंभीर आरोप (BRS News) बीआरएसचे कदीर मौलाना यांनी केला. बीआरएसमध्ये प्रवेश करण्यापुर्वी अनेक वर्ष कदीर मौलाना हे राष्ट्रवादीत होते, प्रदेश उपाध्यक्ष असतांना त्यांनी पक्षाला रामराम ठोकत बीआरएसमध्ये प्रवेश केला होता.

BRS News, Marathwada
Dharashiv NCP News : राष्ट्रवादी नामशेष, राहुल मोटे तग धरणार का ?

काल राज्याच्या राजकारणात (NCP) अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी भूकंप घडवून आणला. मात्र हा भूकंप नसून पवार कुटुंबियांनी ठरवून केलेला कार्यक्रम असल्याचा दावा मौलाना यांनी पत्रकारांशी बोलतांना केला. (Jayant Patil) राज्यात जातीयवादी आणि धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणाऱ्या पक्षाने जनतेची दिशाभूल केली आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेचा वापर केला आहे.

धर्मनिरपेक्षतेच्या नावावर काही राजकीय पक्षांनी मते घेतली परंतु तेच आज सत्ते सहभागी झाले आहेत. सध्याची राजकीय उलथापालथ ही (Sharad Pawar) शरद पवारांच्या घरामधून ठरवून होत आहे. गेल्या २५ वर्षा पासून मी या पवार घराण्याला पाहत आलो आहे. या घरामध्ये जयंत पाटील हे शकुनीमामा आहेत. तर शरद पवार व अजित पवार हे सगळे एका माळेचेच मणी असल्याचा आरोपही मौलाना यांनी केला.

औरंगजेब हा चांगला राजा होता, त्याने त्याच्या राज्यात कोणालाही त्रास दिला नाही. उलट त्याने येथील हिंदू धर्मीयांच्या मंदिराला जागा दिली. तो जातीवादी नव्हता, त्याच्या राज्यात गंगा जमुना व्यवस्था नांदत होती. मात्र आज त्याच्या नावाने राजकारण करण्यात येत आहे, असेही मौलना म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com