जात विचारणाऱ्या बिल्डर, कर्मचाऱ्यांना वकिलाचा दणका; सहा जणांवर अ‍ॅट्रॉसिटी

आम्ही तुम्हाला घर देणार नाही, असे सांगत त्या कर्मचाऱ्याने गंडले व त्यांच्या कुटुंबियांना जायला सांगितले. (Aurangabad District)
Atrocity Filed Against Builder
Atrocity Filed Against BuilderSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : विविध जाती-धर्माच्या लोकांनाच आम्ही घर विकतो असं अभिमानाने सांगणाऱ्या बांधकाम व्यवसायिकांना दणका आणि अद्दल घडवणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे.(Aurangabad) रो हाऊस बुक करण्यासाठी गेलेल्या एका दाम्पंत्याला बिल्डरच्या माणसाने तुम्ही कोणत्या जातीचे आहात असे विचारले.

संबंधित कुटुंबाला हा प्रकार जर विचित्रच वाटला. बरं बिल्डरची माणसं एवढ्यावच थांबली नाही तर संबंधित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबाला घर दाखवण्यास देखील टाळाटाळ केली. (Atrocity) पण जी व्यक्ती आपल्या कुटुंबासह घर पहाण्यासाठी आली होती ती वकिल होती. (Marathwada) त्यामुळे जात पाहून घर विकणाऱ्या बिल्डरला अद्दल शिकवण्याचे ठरवून या वकिलांनी संबंधित बिल्डर आणि त्यांच्याकडे कामावर असणाऱ्या संबंधित सहा जणांवर थेट अट्राॅसिटीचीचा गुन्हा दाखल करायला लावला.

हा प्रकार औरंगाबाद शहरात घडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. शहरापासून काही अंतरावर असलेल्या हिरापूर भागातील एक बांधकाम व्यावसायिकाच्या साईटला भेट देण्यासाठी अॅड.गंडले आपल्या कुटुंबासह गेले होते. रो हाऊस खरेदी करण्याच्या हेतून ते गेले आणि त्यांनी बिल्डरच्या लोकांना घर दाखवण्यास सांगितले. तेव्हा साई़टवरील बिल्डरच्या व्यक्तीने त्यांना तुम्ही कोणत्या जातीचे आहात, असा प्रश्न विचारला.

यावर गंडले यांना आश्चर्य वाटले. आपण अनुसूचित जमातीचे आहोत असे गंडले यांनी सांगितल्यावर संबंधित कर्मचाऱ्याने घर दाखवण्यास टाळाटाळ केली. आम्ही तुम्हाला घर देणार नाही, असे सांगत त्या कर्मचाऱ्याने गंडले व त्यांच्या कुटुंबियांना जायला सांगितले. हा गंभीर प्रकार घडल्यानंतरही गंडले यांनी संबंधित बिल्डरच्या कार्यालयात जाऊन घर खरेदीची चौकशी केली, तर तिथेही त्यांना जात विचारण्यात आली.

Atrocity Filed Against Builder
आरोग्यमंत्र्याच्या जिल्ह्यातील 17 आरोग्य अधिकाऱ्यांना नोटीस

त्यानंतर मात्र गंडले यांनी या सगळ्यांना अद्दल शिकवण्याचे ठरवून थेट चिकलठाणा पोलिस स्टेशन गाठले. तिथे मकरंद देशपांडे, सोमाणी, जैन यांच्यासह बांधकाम साईटवरील कर्मचारी योगेश निमगुडे, सागर गायकवाड व इतर अशा सहा जणांच्या विरोधात अट्राॅसिटीची तक्रार दाखल केली. त्यानंतर या सगळ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.चा गुन्हा दाखल करायला लावला.

त्यानंतर मात्र गंडले यांनी या सगळ्यांना अद्दल शिकवण्याचे ठरवून थेट चिकलठाणा पोलिस स्टेशन गाठले. तिथे मकरंद देशपांडे, सोमाणी, जैन यांच्यासह बांधकाम साईटवरील कर्मचारी योगेश निमगुडे, सागर गायकवाड व इतर अशा सहा जणांच्या विरोधात अट्राॅसिटीची तक्रार दाखल केली. त्यानंतर या सगळ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com