Devendra Fadnavis News : फडणवीसांची अशोक चव्हाणांवर बोचरी टीका; म्हणाले, "तुमची मजल टु-जी, थ्री-जी अन् सोनियाजी..."

Nanded BJP Meeting : २०२४ मध्ये भाजप महाविजयाच्या तयारीला लागले
Ashok Chavan, Devendra Fadnavis
Ashok Chavan, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis Attack on Ashok Chavan : भाजपने लोकसभेची तयारी सुरू केली आहे. त्याअनुषंगानेच नांदेडमध्ये आज शनिवारी (ता. १०) भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा झाली. या सभेपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपवर घणाघात केला होता. भाजप सध्या कमजोर ठिकाणी सभा घेत असल्याचे चव्हाण म्हणाले होते. चव्हाण यांच्या टीकेचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला आहे. (latest Marathi News)

नांदेड येथे भाजपची 'मोदी अॅट ९' अनुषंगाने सभेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, "अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणतात भाजपला निवडून येण्याची खात्री नाही म्हणून सभा घेतात. मात्र असे काही नाही. नऊ वर्षात भाजपने केलेले काम सांगण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. तसे काम तुमच्याकडे नाही. तुमची मजल टू-जी, थ्रीजी आणि सोनियाजी या पलिकडे गेलीच नाही. तुमच्याकडे सागण्यासारखे काही उरले नाही. त्यामुळे तुम्ही लोकांना काय सांगणार?"

Ashok Chavan, Devendra Fadnavis
Shivsena Women officials Clash : शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी भिडल्या; पोलिसांसमोरच झटापट, शिविगाळ अन्...

यावेळी फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेस पक्षावरही टीका केली. फडणवीस म्हणाले, "काँग्रेसला अधूनमधून विजय मिळतो. तो त्यांच्या डोक्यात जातो. आता काँग्रेस नेते उठतात आणि म्हणतात राज्यात कर्नाटक पॅटर्न राबवणार. कालपर्यंत कर्नाटकचे नाव घेतले तरी त्यांना राग येत होता. आज ते कर्नाटक पॅटर्नची भाषा करतात. मात्र त्यांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रात फक्त एकच पॅटर्न चालतो. तो म्हणजे छत्रपती शिवरायांचा पॅटर्न. हा पॅटर्न नरेंद्र मोदी यांनी आणला आहे. त्यामुळे राज्यात फक्त मोदी पॅटर्न चालणार."

विरोधकांवर टीका करताना फडणवीस म्हणाले, "निवडणुका आल्या की शरद पवार (Sharad Pawar) देशात विरोधकांची हवा असल्याचे वारंवार सांगतात. मोदींची लाट संपलेली आहे. जनतेत विरोधकांची हवा आहे. मात्र जेवढे विरोधक नेते एकत्र आले तेवढ्या जागाही देशभरात त्यांना मिळाल्या नाहीत. आता पुन्हा निवडणुका आल्या आहेत. आताही ते तेच बोलत आहे. मात्र कालही देश मोदींच्या मागे होता. आजही आहे आणि उद्याही राहीन."

Ashok Chavan, Devendra Fadnavis
Solapur BJP MLA : भाजप आमदार म्हणाले, ‘लोकं म्हणतात दारुविक्रीत माझा हात... ’ ; भरसभेतून लावला APIला फोन

भाजपला जास्त जागा कोण देणार अशी स्पर्धा राज्या-राज्यांत लागल्याचेही फडणवीसांनी सांगितले. ते म्हणाले, "उत्तर प्रदेश, महाराष्ट्र (Maharashtra) आणि गुजरात या राज्यात भाजपला जास्त जागा कोण देणार, अशी स्पर्धा लागली आहे. महाराष्ट्राने २०१४ मध्ये ४२ जााग दिल्या. २०१९ ला ४१ जागा दिल्या आहेत. आता २०२४ मध्ये ४२ हून अधिक जागा देऊन नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पुन्हा पंतप्रधान करणार आहे."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com