Marathwada Political News : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी येत्या ६ ते ८ नोव्हेंबर दरम्यान मध्य प्रदेशातील धीरेंद्र शास्त्री यांच्या कथेचे छत्रपती संभाजीनगरात आयोजन केले आहे. (AIMIM Political News) याची माहिती कराड यांनीच स्वतः फेसबुकवर पोस्ट करत दिली. याचाच उल्लेख करत खासदार इम्तियाज जलील यांनी कराड यांच्यावर निशाणा साधला आहे.
निवडणुका जवळ येताच नागरिकांना गुंगविण्यासाठी आणि मूलभूत प्रश्नांपासून दूर नेण्यासाठी धर्माचे शस्त्र, अस्र काढण्यास सुरुवात झाली आहे.....सांभाळून!, अशा शब्दांत इम्तियाज (Imtiaz Jaleel) यांनी टीका केली आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून डाॅ. भागवत कराड (Dr.Bhagwat karad) यांच्याकडे पाहिले जाते.
भाजपने त्यांना उमेदवारी दिली तर एमआयएमच्या इम्तियाज जलील यांच्या विरोधात त्यांचा सामना होणार आहे. (BJP) त्यामुळे संधी मिळेल तेव्हा हे दोघेही ऐकमेकांवर टीका करत असतात. अडीच-तीन वर्षापूर्वी जातीय समीकरणामुळे डाॅ. कराड यांची भाजपने थेट महाराष्ट्रातून राज्यसभेवर वर्णी लावली. हे कमी काय म्हणून त्यांना थेट केंद्रात अर्थ खात्याचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी दिली.
राजकारणात छप्पर फाडके मिळणारे एकमेव नेते म्हणून कराड यांचा उल्लेख केला जातो. राज्यसभेवर खासदार आणि केंद्रात अर्थ राज्यमंत्री असलेल्या कराड यांना आता छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे. त्यासाठी त्यांनी वर्षभरापासून तयारी सुरू केली. आता निवडणूक सहा महिन्यांवर आलेली असताना हिंदुत्ववादी मते आपल्या पारड्यात पडावीत, या हेतूने त्यांनी पुढील महिन्यात मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या कथा आणि दरबाराचे आयोजन संभाजीनगरात केल्याचे बोलले जाते.
यासंदर्भात कराड यांनी धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेतल्याचा फोटो पोस्ट करत कथेच्या आयोजनाची माहिती दिली. त्याच फोटोचा दाखला देत इम्तियाज जलील यांनी कराड आणि भाजपवर टीका केली आहे. निवडणुका आल्या की, भाजप धर्माचे राजकारण पुढे करते आणि लोकांच्या मूलभूत प्रश्नांवरून लक्ष हटवते, असा आरोप इम्तियाज यांनी केला आहे. तसेच निवडणुका आल्यामुळे सांभाळून, असा सावधानतेचा इशाराही त्यांनी `एक्स`वरील पोस्टच्या माध्यमातून दिला आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.