Video Pankaja Munde : हाकेंचं उपोषण स्थगित होताच पंकजा मुंडेंची मोठी मागणी; म्हणाल्या,'जातनिहाय जनगणना..'

Maratha Vs Obc Reservation : मराठा आणि ओबीसी समाजात भांडण नकोत, ही माझी कायम भूमिका राहिली आहे. दोन्ही समाजाच्या लोकांनी आपले संविधानिक मुद्दे एकत्र मुख्यमंत्र्यांसमोर बसून मांडावेत.
Pankaja Munde News
Pankaja Munde NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed News : ओबीसी आणि मराठा हे बहुजन होते. त्यांच्यात भांडणं नकोत ही माझी कायम भूमिका राहिली आहे. दोन्ही समाजाच्या लोकांनी आपले संविधानिक मुद्दे एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांसमोर बसून मांडावे, असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. प्रत्येक समाजाची जातनिहाय जनजणना झालीच पाहिजे, आमची अनेक वर्षापासूनची ही मागणी असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या. ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांना आपण भेटलो होतो. त्यांच्या तब्बेतीची चौकशी वेळोवेळी करत होते. हाके यांनी केलेल्या मागणीबाबत शुक्रवारी आमची बैठक झाली. त्यामध्ये मी विचार मांडले होते. शिष्टमंडळाला आज त्यांच्याकडे पाठविण्यात आले होते. सरकारने त्यांच्या भूमिकेची दखल घेतली. त्यामुळे या दोघांनी गेल्या दहा दिवसांपासून सुरू केलेले उपोषण तात्पुरते स्थगित केले, ही चांगली गोष्ट आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

Pankaja Munde News
Video Chhagan Bhujbal : हाकेंच्या उपोषणस्थळावरून छगन भुजबळांची मोठी मागणी,' ओबीसींना विधानसभा...'

ओबीसी आणि मराठा समाजात सध्या दिसत असलेले चित्र दुर्दैवी आहे. आरक्षणासाठी हे दोन्ही समाज एकमेकांच्या विरोधात उभे राहत आहेत, ही मोठी खेदाची बाब आहे. आपली पुरोगामी परंपरा कायम राहिली आहे. मराठा (Maratha) आणि ओबीसी समाजात भांडण नकोत, ही माझी कायम भूमिका राहिली आहे. दोन्ही समाजाच्या लोकांनी आपले संविधानिक मुद्दे एकत्र मुख्यमंत्र्यांसमोर बसून मांडावेत. घटना आणि कायद्यावर कोणी नाही, असेही त्यांनी सांगितले.

Pankaja Munde News
Video Chhagan Bhujbal : "जमाना जानता हैं हम किसीके बाप से भी नहीं डरते हैं", भुजबळांचा जरांगे-पाटलांना इशारा

माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा मराठा आरक्षणाबाबत एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, 288 पैक्की 200 आमदार हे मराठा समाजातील आहेत. इतरही काही ठिकाणी मराठा आमदार आल्याने त्यांना राजकीय आरक्षणाची गरज नाही, असे मुंडे साहेबांचं म्हणणं होत. आज मुंडे साहेब हयात नाहीत. पण मराठा समाजाला राजकीय आरक्षणाची गरज नाही असे त्यांचे मत होत असल्याचे त्या म्हणाल्या. राज्यसभेवर तुम्हाला पाठविले जाणार असल्याच्या प्रश्नावर मी देखील तसं ऐकलं असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com