Video Chhagan Bhujbal : हाकेंच्या उपोषणस्थळावरून छगन भुजबळांची मोठी मागणी,' ओबीसींना विधानसभा...'

OBC Reservation Chhagan Bhujbal demand politic al reservation : वडीगोद्रीत छगन भुजबळ यांच्यासह उदय सामंत,गुलाबराव पाटील, धनंजय मुंडे, प्रकाश महाजन असे पाच मंत्री लक्ष्मण हाकेंना भेटले.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbalsarkarnama

Chhagan Bhujbal News : वडीगोद्रीत लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळी सरकारच्या शिष्टमंडळानी भेट दिली. या शिष्टमंडळात असलेल्या मंत्री छगन भुजबळ यांनी मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या आम्ही त्याला पाठींबा देवू, असे सांगत पंकजाताईंनी जातीय विरोध केला नसताना त्यांना पाडलं. मग लोकसभेला आणि विधानसभेला ओबीसींना आरक्षण हवं, अशी मागणी केली.

वडीगोद्रीत छगन भुजबळ यांच्यासह अतुल सावे, उदय सामंत,गुलाबराव पाटील, धनंजय मुंडे, प्रकाश महाजन असे पाच मंत्री लक्ष्मण हाकेंना भेटले. सरकारसोबत झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी हाकेंना दिली.

आरक्षण हा गरिबी हटाओ कार्यक्रम नाही. आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या. आमचा पाठींबा आहे. आमच्या ताटातलं त्यांना देवू नका. त्यांना दुसरं ताट द्या, असे म्हणत छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास तीव्र विरोध केला.

Chhagan Bhujbal
OBC Political Breaking : मोठी बातमी! अखेर दहा दिवसानंतर लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारेंचं उपोषण स्थगित

अन्याय झालेले समाज हळूहळू पुढे येत आहेत. आम्ही कुणाला धमक्या दिल्या नाहीत. आम्ही कोणाला घाबरत नाही, असे म्हणत भुजबळांनी मनोज जरांगे पाटील Manoj Jarange यांना नाव न घेता डिवचले. तसेच तो काय बोलतो हे त्यालाच कळत नाही, असे म्हणत जरांगेंची खिल्ली देखील उठवली.

कुणबी दाखल्यांचे वाटप केले होते. त्यामुळे हे दाखल रद्द करण्याची मागणी लक्ष्मण हाके यांनी केली होती.त्यावर देखील भुजबळ बोलले. ते म्हणाले, अनेक ठिकाणी खोट्या दाखल्याचे वाटप झाले आहे. खोट्या दाखल्यांचे वाटप करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. राज्यात अनेक ठिकाणी खोटे कुणबी दाखले देण्यात आले आहेत.

Chhagan Bhujbal
Devendra Fadnavis News : काल अटल सेतू आणि आज पाणीपट्टी वाढ ; फडणवीसांकडून काँग्रेसवर पलटवार...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com