Chandrakant Khaire News : सोमय्या ईडीचा दलाल, त्याला कमिशन मिळते ; खैरेंचा दावा..

Shivsena : खैरेंनी याआधी देखील सोमय्या यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.
Kirit Somaiya-Chandrakant Khaire
Kirit Somaiya-Chandrakant KhaireSarkarnama
Published on
Updated on

Jalna : ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपच्या किरीट सोमय्या यांच्यावर गंभील आरोप केला आहे. सोमय्या (Kirit Somaiya) हे ईडीचे दलाल असून त्यांना ईडीच्या पैशातून कमीशन मिळत असल्याचा दावा खैरे यांनी केला आहे. जालना येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना खैरे यांनी सोमय्या यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.

Kirit Somaiya-Chandrakant Khaire
Imtiaz Jalil News : मुशायरा, कव्वालीच्या कार्यक्रमात गर्दी करणारे आंदोलनात का येत नाहीत ?

राज्यात सध्या ईडीच्या कारवायांवरून वातावरण तापले आहे. विशेष म्हणजे या सगळ्या प्रकरणांमध्ये भाजपच्या किरीट सोमय्यांचे नाव सातत्याने पुढे येते. (Shivsena) ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या रिसाॅर्ट व आता राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर टाकलेली ईडीची धाड या सगळ्यांमध्ये सोमय्या यांचे कनेक्शन समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर खैरे (Chandarakant Khaire) यांनी हे आरोप केले आहेत.

खैरे म्हणाले, किरीट सोमय्या ईडीचा दलाल आहे, त्याला ईडीच्या पैशातून मिळते. इन्कम टॅक्सला ज्या खबऱ्याने माहिती दिली, त्या खबऱ्याला त्यांना काहीतरी द्यावे लागत असते, तेच काम सोमय्या देखील करतो. ईडीच्या कारवाईबाबत आधीच या भाजपच्या माणसाला कसे काय कळते? की, उद्या अमूक एखाद्या नेत्यावर धाड पडणार आहे.

त्यामुळे काहीतरी मिलीभगत करून भाजप विरोधकांना त्रास देत आहे. या सगळ्या मागे किरीट सोमय्या हेच असून त्यांची स्वतःची अनेक लफडी आहे. तेव्हा सरकार येतात जातात हे त्यांनी ध्यानात ठेवावे. पुढे यांचे काय होते ते दिसेलच, असा इशारा देखील खैरे यांनी यावेळी दिला.

खैरेंनी याआधी देखील सोमय्या यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. तसेच ते सोमय्या यांचा उल्लेख शक्तीकपूर असा करतात. खैरे यांनी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला गेले, तेव्हा देखील निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com