Kannad APMC Members Meet CM News : कन्नड बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालकांना मुख्यमंत्र्यांची शाबासकी..

Abdul Sattar : शिंदे गटाच्या पॅनलची कमान माजी आमदार आणि जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी सांभाळली होती.
Kannad APMC Members Meet CM News
Kannad APMC Members Meet CM News Sarkarnama

Marathwada : नुकत्याच झालेल्या कन्नड बाजार समिती निवडणुकीत (Kannad APMC Members Meet CM News) शिंदे गटाने एकहाती सत्ता मिळवत सर्व १८ संचालक निवडून आणले. विशेष म्हणजे राज्यातील सत्तांतरात उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या आमदार उदयसिंह राजपूत यांच्या पॅनलचा मतदारसंघातच धुव्वा उडाला. त्यामुळे शिंदे गटासाठी हा विजय महत्वाचा मानला जातो.

Kannad APMC Members Meet CM News
Parali APMC News : परळी बाजार समितीच्या सभापतीपदी सुर्यभान मुंडे, तर जयश्री जाधव उपसभापती..

शिंदे गटाच्या पॅनलची कमान माजी आमदार आणि जिल्हा बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष नितीन पाटील यांनी सांभाळली होती. (Kannad APMC) शिवाय केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनी देखील शिंदे गटाच्या पॅनलशी युती केली होती. या सगळ्या नवनिर्वाचित संचालकांची भेट नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी (Eknath Shinde) घडवून आणण्यात आली.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यासोबत काल (ता.१६) काही संचालकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. ठाकरे गटाच्या आमदाराच्या मतदारसंघात सगळ्या जागा जिंकून विजय मिळवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी या संचालकांची पाठ थोपटत त्यांना शाबसकी देखील दिली. तसेच नवनिर्वाचित संचालकांचा सत्कारही केला. अब्दुल सत्तार यांनी प्रत्येकाची मुख्यमंत्र्यांशी वैयक्तिक ओळख करून दिली.

कन्नड बाजार समितीमध्ये शिवसेना प्रणित पॅनलने सर्व जागा जिंकत ठाकरे गटासह महाविकास आघाडीला मोठा दणका दिला होता. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख केतन काजे, जिल्हा बँकेचे संचालक डॉ. मनोज राठोड, जिल्हा दूध संघाचे संचालक गोकुळसिंग राजपूत, माजी उपनगराध्यक्ष अब्दुल जावेद यांच्यासह नवनिर्वाचित संचालक तसेच कन्नड तालुका शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com