Imtiaz Jalil News : पंतप्रधान अवास योजनेची ४६ हजार घरे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी पळवली..

Aimim : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना ती औरंगाबादबाहेर हवी आहेत.
Mp Imtiaz Jalil News,Chhatrapati Sambhajinagar
Mp Imtiaz Jalil News,Chhatrapati SambhajinagarSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : शहरात पंतप्रधान अवास योजनेमध्ये मंजुर झालेल्या ५२ हजार घरापैकी आता फक्त ६ हजारच बांधली जाणार असल्याचा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी केला. उर्वरित हजारो घरे ही इतर शहरात हलवण्यात आली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इच्छेमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा देखील इम्तियाज यांनी केला आहे.

Mp Imtiaz Jalil News,Chhatrapati Sambhajinagar
Nitin Bangude News : ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा `सुवर्णकाळ` येणारच..

या संदर्भात एक पोस्ट इम्तियाज यांनी केली आहे. त्यानूसार इम्तियाज म्हणतात, अनेक प्रयत्नांनंतर गरिबांसाठी ही घरे मंजूर झाली होती. ५२ हजार गरीब लोक (PM Modi) पीएम आवास योजनेसाठी पात्र ठरल्याचा मुद्दा मी संसदेत मांडला होता. त्यानंतर मी सदस्य असलेल्या यूडी समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला. ही सर्व ५२ हजार घरे गरिबांना द्यायची होती, ती मंजूर करणे सरकारला भाग पडले. आता भाजपचे काही नेते त्यात अडकल्यानंतर सगळा वाद सुरू झाला आहे.

आता सहा हजार घरे बांधली जाणार आहेत. मला सांगण्यात आले आहे की उर्वरित मंजूर घरे इतर शहरात हलवली जात आहेत. कारण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना ती औरंगाबादबाहेर हवी आहेत. गरिबांच्या घरांची ही संख्या का कमी झाली, असा सवाल केंद्र सरकारमधील भाजपच्या दोन बाहुल्यांना पडेल का?

सर्व पात्र असताना गरीब लाभार्थ्यांची फसवणूक का झाली. एवढी वर्षे घरासाठी वाट पाहणाऱ्या गरिबांच्या जीवाशी खेळ तर नाही ना? मार्च २०२० पर्यंत सर्व बेघर लोकांना पक्की घरे मिळतील असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले नव्हते का ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थीत केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com