Jalna Maratha Protest News : मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईत उपचार करू; पण जरांगेंनी गावकऱ्यांची साथ सोडली नाही...

Marathwada Political News : डाॅक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. विविध तपासण्या, सोनोग्राफी करून जरांगे यांना योग्य उपचार दिले जाणार आहेत.
Maratha Protest News
Maratha Protest NewsSarkarnama

Maratha Reservation News : अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सतरा दिवस उपोषण करून राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सामान्यांची मनं जिंकली आहेत. (Jalna Protest News) २९ आॅगस्ट ते १४ सप्टेंबरपर्यंत अंतरवालीत उपोषण सुरू केल्यानंतर १ सप्टेंबर रोजी आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला होता. त्यानंतर हे आंदोलन चिघळले आणि त्याचे पडसाद राज्यभरात उमटले होते.

Maratha Protest News
Slogan against Girish Mahajan : मराठा आरक्षणाची मागणी करत गिरीश महाजनांच्या विरोधात घोषणाबाजी...

मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने विनवण्या करूनही जरांगे आपल्या भूमिकेवरून मागे न हटल्याने त्यांना समाजाचा मोठा पाठिंबा मिळाला. (Maratha Reservation) अखेर मुख्यमंत्र्यांनी स्वतः अंतरवालीत येत जरांगे यांना मराठा आरक्षण देण्याचा विश्वास दिला आणि जरांगे यांनी एक महिन्याचा वेळ देत उपोषण मागे घेतले. (Jalna) दरम्यान, त्यांचे वजन सात ते आठ किलोने कमी झाले.

उपोषणामुळे प्रचंड अशक्तपणा आला होता, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांना फोन करून उपचारासाठी मुंबईला या, असे आवाहन केले होते. (Marathwada) परंतु आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीहल्ल्यात जखमी सहकाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगर येथे ज्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तिथेच आपल्यावर उपचार केले जावेत, असा आग्रह जरांगे पाटील यांनी धरला.

त्यानुसार आज शहरातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जरांगे पाटील उपचारासाठी दाखल झाले. पोलिस बंदोबस्तात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, डाॅक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. विविध तपासण्या, सोनोग्राफी करून जरांगे यांना योग्य उपचार दिले जाणार आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री व गावकऱ्यांनी विनंती केल्यामुळे उपचारास आलो, मला काही झालेले नाही. साखळी उपोषण अजूनही सुरू आहे, डॉक्टरांनी काही तपासण्या केल्या आहेत. त्याचे रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी सांगितल्यास भरती होईल; अन्यथा अंतरवाली सराटी येथे पुन्हा साखळी उपोषणाला जाईल, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. जरांगे यांना दोन दिवस रुग्णालयात ठेवणार आहेत.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com