CM Eknath Shinde News : मुख्यमंत्र्यांच्या धाराशीव दौऱ्यात महायुतीचा उमेदवार ठरणार ?

Dharashiv Politcal News : ओमराजे यांच्याविरोधात मुख्यमंत्री तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत.
CM Eknath Shinde News
CM Eknath Shinde News Sarkarnama
Published on
Updated on

Marathwada Shivsena News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मराठवाडा दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. शिंदेच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडात धाराशीव जिल्ह्यातूनही साथ मिळाली. (CM Eknath Shinde News) भूम-परांडाचे तत्कालीन आमदार प्रा. तानाजी सावंत, उमरग्याचे ज्ञानराज चौघुले यांनी शिंदेंना साथ दिली. मुख्यमंत्र्यांनी सावंत यांना राज्याचे आरोग्य मंत्री करत त्याची परतफेडही केली. आमदार ज्ञानराज चौघुले यांची झोळी मात्र रिकामीच राहिली.

CM Eknath Shinde News
Eknath Shinde: शिंदेंनी सांगितली व्याख्या; CM म्हणजे...

मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) हा दुसरा धाराशीव दौरा आहे. यापुर्वी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांची पाहणी करण्यासा्ठी मुख्यमंत्री आले होते. (Shivsena) परंतु 10 जानेवारीचा त्यांचा दौरा हा पुर्णपणे संघटनात्मक बांधणी आणि शिवसैनिकांना बुस्टर डोस देण्यासाठीचा असणार आहे.

शिवसेनेत शिंदेच्या नेतृत्वाखाली बंड पुकारण्यात आले तेव्हा धाराशीव-कळंबचे आमदार कैलास पाटील यांनाही त्यांची दिशाभूल करून सुरतला नेण्यात येणार होते. (Marathwada) परंतु कैलास पाटील यांना शिवसेना फोडण्याच्या कारस्थानाचा सुगावा लागला आणि लघुशंकेचा बहाणा करत कैलास पाटील यांनी धूम ठोकली होती. काही किलोमीटर पायी चालत कैलास पाटील यांनी मुंबई गाठली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तर धाराशीवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हेही ठाकरे गटाशी एकनिष्ठ राहिले. या खासदार-आमदाराच्या जोडीमुळेच धाराशीवमध्ये अजूनही उद्धव ठाकरेंची शिवसेना खंबीरपणे उभी आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे यांच्याविरोधात मुख्यमंत्री तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. महायुतीमध्ये धाराशीवच्या जागेवर पहिला दावा हा शिंदेच्या शिवसेनेचा असणार आहे.

त्यादृष्टीनेच मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याकडे बघितले जाते. या दौऱ्यात मुख्यमंत्री लोकसभेच्या दृष्टीने तयारीला लागा, असा आदेश कोणाला देतात? याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मराठवाड्यातील बहुतांश लोकसभा मतदारसंघात भाजपने आपली स्वतंत्र तयारी सुरू केली आहे. महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठीची ही तयारी असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जाते.

इकडे शिंदेसेनेकडून माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड पुन्हा मैदानात उतरण्यास इच्छूक आहे. त्यासाठीच त्यांनी काही महिन्यांपुर्वी शिंदे गटात प्रवेश केला होता. तर भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना पुन्हा ओमराजेंच्या विरोधात लढवण्यास इच्छूक आहे. अशावेळी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातून 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार कोण असेल? याचे स्पष्ट संकेत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Edited By : Jagdish Pansare

CM Eknath Shinde News
Dharashiv Loksabha News : 'मित्रपक्षांना दावा करण्याचा अधिकार, मात्र 'धाराशिव'बाबत निर्णय नाही' ; राणाजगजितसिंह म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com