Devendra Fadnavis On Sanjay Shirsat : आरोप रोजच होत असतात, पुरावे द्या! संजय शिरसाट यांच्यावरील आरोपांवर फडणवीसांची स्पष्ट भूमिका..

CM Devendra Fadnavis dismissed the allegations against MLA Sanjay Shirsat : सिडकोचे अध्यक्ष असताना संजय शिरसाट यांनी बिवलकर कुटुंबीयांना हजारो कोटींची दीडशे एकर जमीन दिल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता.
Sanjay Shirsat -CM Devendra Fadnavis News
Sanjay Shirsat -CM Devendra Fadnavis NewsSarkarnama
Published on
Updated on

Cidco Land Scams : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सिडकोत झालेल्या पाच हजार कोटींच्या जमीन घोटाळ्याचा दावा केला होता. पत्रकार परिषद घेत त्यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी ते सिडकोचे अध्यक्ष असताना दीडशे एकर जमीन मुंबईतील बिवलकर यांना देऊन पाच हजार कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. या भ्रष्टाचाराची चौकशी करून संजय शिरसाट यांचा राजीनामा घ्या, अशी मागणीही करत रोहित पाटील यांनी खळबळ उडवून दिली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या आरोपाला फारसे गांभीर्याने घेतले नाही.

आरोप तर रोज होत राहतात, पुरावे द्या, असे म्हणत त्यांनी रोहित पवार यांनाच आव्हान दिले. सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर 5000 कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. या भ्रष्टाचाराची चौकशी आणि संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी करत नवी मुंबई येथील सिडको भवनावर मोर्चा काढण्याचा इशाराही रोहित पवार यांनी दिला होता. या संदर्भात माध्यमांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना छेडले असता असे आरोप रोजच होत असतात, पुरावे द्या, असे म्हणत फडणवीस यांनी संजय शिरसाट यांची पाठराखण केली.

सिडकोचे अध्यक्ष असताना संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी बिवलकर कुटुंबीयांना हजारो कोटींची जमीन दिल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले, रोहित पवार यांच्यासारखी मंडळी रोजच असे आरोप करत असतात. पण पुरावे दिले पाहिजेत. पुरावे नसताना असे आरोप करणे योग्य नाही. ही केस अजून मी पाहिलेली नाही. मात्र पुराव्यानिशी आरोप केले तर त्या आरोपांना तेवढेच परिणामकारक उत्तर दिले जाते. रोहित पवार यांच्याकडे काय पुरावे आहेत आणि रोहित पवारांनी काय आरोप केलेत हे मला माहिती नाही. पण विना पुराव्याचे आरोप केले जात आहेत, असे फडणवीस म्हणाले.

Sanjay Shirsat -CM Devendra Fadnavis News
Rohit Pawar : रोहित पवारांच्या हातून आणखी एका मंत्र्याची होणार शिकार? 5,000 कोटींचा घोटाळा, निवडणुकीत पैसा वापरल्याचा खळबळजनक आरोप

संजय शिरसाट यांच्यावर मध्यंतरीच्या काळात अनेक गंभीर आरोप झाले. यात छत्रपती संभाजीनगर येथील हाॅटेल व्हिट्स खरेदी-विक्री, शेंद्रा एमआयडीसीतील आरक्षण बदलून प्लाॅट खरेदी, शहर व शहरालगत बेकायदा मालमत्ता, जमीन, प्लाॅट खरेदी यासह सामाजिक न्याय विभागात दीड हजार कोटींचा टेंडर घोटाळ्याच्या आरोपांनी शिरसाट चांगलेच गोत्यात आले. या पैकी फक्त व्हिट्स हाॅटेल खरेदी-विक्री प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

Sanjay Shirsat -CM Devendra Fadnavis News
Imtiaz Jaleel On Sanjay Shirsat : मोठ्या उद्योगपतीच्या घशात सिडकोची जमीन घालण्यासाठीच शिरसाटांना सिडकोचे अध्यक्ष केले!

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानेव यांच्यासह विरोधकांनी हाॅटेल खरेदी-विक्री प्रक्रियेत संजय शिरसाट यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करत दबाव आणला आणि 120 कोटींचे हाॅटेल 67 कोटीत खरेदी केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशीची घोषणा मुख्यमंत्र्‍यांनी सभागृहात केली होती. इतर आरोपांची मात्र कुठलीही दखल सरकारकडून घेण्यात आलेली नाही. रोहित पवार यांनी केलेल्या आरोपानंतर फडणवीस यांनी त्यांच्याकडेच पुरावे मागत शिरसाट यांना अभय दिल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com