Devendra Fadnavis On Babanrao Lonikar : मोदीजी स्वतःला प्रधान सेवक सांगतात, आम्हीही सेवकच मालक होता येणार नाही! लोणीकरांना समज देणार!

Maharashtra CM Devendra Fadnavis to reprimand BJP leader Babanrao Lonikar for his completely incorrect statement. : लोणीकरांचं विधान हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यांनी जरी काही लोकांना उद्देशून असं वक्तव्य केलं असलं तरीही अशा प्रकारचं विधान करायचा कुणालाही अधिकार नाही.
Devendra Fadnavis On Babanrao Lonikar News
Devendra Fadnavis On Babanrao Lonikar NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. लोणीकरांनी शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेची माफी मागावी, त्यांना रस्त्यावर फिरू देऊ नका, अशा प्रकारचा संताप समाज माध्यमांवरून व्यक्त केला जात आहे. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाची दखल घेत त्यांचे वक्तव्य पूर्णपणे चुकीचे असून त्यांना समज देण्यात येईल, असे म्हटले आहे.

देशाचे प्रधानमंत्री ज्यावेळेस सांगतात की, मी प्रधान सेवक आहे आणि आम्ही सर्व जण जनतेचे सेवक आहोत. तर आम्हाला मालक बनता येणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी लोणीकरांची (Babanrao Lonikar) कानउघाडणी केली आहे. काल परतूर येथील एका कार्यक्रमात बोलताना बबनराव लोणीकर यांनी सोशल मीडियावर सरकार आणि स्वतःच्या विरोधात टीका करणाऱ्या तरुणांविषयी संताप व्यक्त केला होता.

कुचरवट्यावर बसलेली काही रिकामटेकडी कार्टी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना अंधभक्त म्हणतात. हीच कार्टी कूचरवट्यावर बसून चर्चा करत असतात पण त्यांच्यापैकी काहींच्या आईचा पगार व बापाचे पेन्शन बबनराव लोणकर यांनीच दिलं आहे. नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीसाठी सहा हजार रुपये दिले, असे वादग्रस्त वक्तव्य लोणीकर यांनी केले. यानंतर राज्यभरातील विविध पक्षाचे नेते लोणीकर यांच्यावर तुटून पडले आहेत.

Devendra Fadnavis On Babanrao Lonikar News
Babanrao Lonikar News : बबनराव लोणीकरांची जीभ सारखी का घसरते? यापूर्वीही ओढावून घेतले वाद!

या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले, तेव्हा बबनराव लोणीकरांचं विधान हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यांनी जरी काही लोकांना उद्देशून असं वक्तव्य केलं असलं तरीही अशा प्रकारचं विधान करायचा कुणालाही अधिकार नाही. देशाचे प्रधानमंत्री ज्यावेळेस सांगतात की, मी प्रधान सेवक आहे आणि आम्ही सर्व जण जनतेचे सेवक आहोत. तर आम्हाला मालक बनता येणार नाही. त्यामुळे बबनराव लोणीकरांचे जे वक्तव्य आहे ते पूर्णपणे चुकीचे असून अशा प्रकारचे वक्तव्य योग्य नाही. याची समज बबनराव लोणीकर यांना देण्यात येईल, असे स्पष्ट केले.

Devendra Fadnavis On Babanrao Lonikar News
Devendra Fadnavis : वीज ग्राहकांसाठी सुखद बातमी! वाढती वीजबिलं आता थांबणार? फडणवीसांनी घेतला दिलासादायक निर्णय!

लोणीकर म्हणाले, आमचेच पैसे घेतो अन् ..

ते कुचकळवाट्यावर बसलेले पाच-सहा कारटे, त्याच्या मायचा पगार बबनराव लोणीकरने केला. त्याच्या बापाला पेरणीसाठी सहा हजार पंतप्रधान मोदी यांनी दिले. तुझ्या मायच्या, तुझ्या बहिणीच्या व बायकोच्या नावावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारने दिले आहेत. तुझ्या पायातील बूट अथवा चप्पल आमच्यामुळेच आहेत. तुझ्या हातातलं डबडं, तो देखील आमच्यामुळेच आहे. आमचेच पैसे घेतो आणि आमच्याच तंगड्या वर करतो. आमचंच घेतो आणि आम्हालाच बोलतो का? आमचं घेऊन आमच्याबद्दल लिहितोस का?", असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com