Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मितभाषी आणि शांत वाटत असले तरी त्यांच्या मनात काय चालते हे ते कुणालाच समजू देत नाही. सहा महिन्यांपुर्वी शिवसेनेसह १० अपक्ष असे ५० आमदार घेऊन बाहेर पडले आणि त्यानंतर थेट (Eknath Shinde) मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. यावरून त्यांच्या राजकीय डावपेचांचा अंदाज येतो.
आज `माझ व्हिजन` या कार्यक्रमा दरम्यानच्या मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नावर शिंदेंनी माजी मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्याबद्दल जाहीर विधान करत त्यांचे टेन्शन वाढवले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मंत्रीमंडळातील कोणत्या मंत्र्याला तुम्ही मिस करता? असा प्रश्न विचारला असता तिथे उपस्थीत अशोक चव्हाण यांच्याकडे स्मित हास्य करत सांगू का? असे म्हणत त्यांनी टिप्पणी केली.
तसेच सगळंच काही सांगायचं नसतं, असे म्हणत नव्या चर्चेला सुरूवात करून दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या व्हिजनबद्दल सांगताना नंतरच्या मुलाखतीत विविध राजकीय पक्षांना उत्तरे दिली. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळातील कोणत्या मंत्र्याला तुम्ही मिस करता? हा प्रश्न विचारताच शिंदे यांनी समोर उपस्थीत असलेल्या अशोक चव्हाणांकडे बघितले आणि हसले. म्हणाले सांगू का? तेव्हा दोघेंही एकमेकांकडे पाहून हसले.
सगळं सागांयच नसतं, अस म्हणत ठाकरे सरकारमध्ये सहकारी मंत्री म्हणून काम करत असतांनाचे अनुभव सांगितले. कॅबिनेटच्या बैठकीत कसे निर्णय घेतले जायचे हे चव्हाणांना चांगलेच माहित आहे, असा टोला देखील शिंदे यांनी लगावला. अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार अशा चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात सुरू आहे. यावर त्यांनी वेळोवेळी स्पष्टीकरण देत या चर्चा अफवा असल्याचे देखील स्पष्ट केले. पण सत्ताधारी पक्षातील कोणीतरी चव्हाणांबद्दल विधान करतो आणि त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा सुरू होते.
नुकतीच नागपूरला काॅंग्रेस प्रदेश कमिटीची महत्वाची बैठक झाली, त्यावेळी अशोक चव्हाण गैरहजर होते. तेव्हा देखील त्यांच्या भाजप प्रवेशाच्या वावड्या उठवल्या गेल्या. त्यावर देखील मी आजारी असल्यामुळे तिथे जावू शकलो नाही, असा खुलासा चव्हाणांना करावा लागला होता. आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चव्हाणांच्या संदर्भात बोलतांना सांगू का? असे म्हणत त्यांच्याबद्दल संशयाचे वातावरण निर्माण केले आहे. जाहीर कार्यक्रमात हसत हसत केलेल्या मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे चव्हाणांचे मात्र टेन्शन वाढले असणार.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.