Chhatrapati Sambahajinagar : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची उद्या (ता.२४) रोजी शहरातील जांबिदा मैदानावर जाहीर सभा होत आहे. या सभेची तयारी गेल्या आठवडाभरापासून सुरू आहे. या सभेच्या निमित्ताने सभेला गर्दी जमवण्यावरून स्थानिक बीआरएसच्या (BRS) नेत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. गंगापूरचे माजी आमदार व त्यांचे पुत्र माने व कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे यात आघाडीवर आहेत.
दोघेही आपापल्या मतदारसंघातून विधानसभा लढवण्यास इच्छूक असल्याने शक्ती प्रदर्शनासाठी त्यांनी जोर लावला आहे. संतोष माने यांनी गंगापूर विधानसभा मतदारसंघातून (K.Chandrashekhar Rao) केसीआर यांच्या सभेसाठी २० हजार लोक आणण्याचा दावा केला आहे. तर हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी कन्नड-सोयगांवमधून त्यांच्यापेक्षा दुप्पट म्हणजे चाळीस हजार लोक आणण्याचा निर्धार केला आहे.
या शिवाय वैजापूरचे अभय पाटील चिकटगावंकर, मध्य विधानसभा मतदारसंघातील कदीर मौलाना यांनी देखील सभेला आपापल्या भागातून मोठ्या प्रमाणावर लोकांना आणण्याची तयारी चालवली आहे. (Marathwada) सभेच्या ठिकाणची सगळी तयारी ही तेलंगणातून आलेल्या महाराष्ट्र निरीक्षक आमदार रेड्डी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.
सभेच्या प्रचारासाठी मतदारसंघात रथ, पोस्टर, भित्ती पत्रक याचे नियोजन हीच टीम करत आहे. स्थानिक नेत्यांची मदत घेत असले तरी सभेला गर्दी जमवण्याची सगळी जबाबदारी ही माने, जाधव, मौलाना, चिकटगांवकर, प्रदीप सोळुंके, जयाजी सुर्यवंशी या स्थानिक नेते, पदाधिकारी यांच्यावर असणार आहे.
नांदेड, लोह्यानंतर केसीआर यांची ही मराठवाड्यातील तिसरी आणि छत्रपती संभाजीनगरमधील पहिलीच सभा आहे. त्यामुळे ती तेवढीच प्रचंड झाली पाहिजे, असा तेलंगणातून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे. या निमित्ताने स्थानिक नेत्यांना आपली ताकद दाखवण्याची संधी देखील मिळणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.