Congrees-Ncp News : नामांतराच्या मुद्यावरून काॅंग्रेस-राष्ट्रवादीचा गोंधळ, नेत्यांना भूमिका घेता येईना..

Marathwada : महाविकास आघाडीच्या संयुक्त सभामधून हे दोन्ही पक्ष नामांतरावर काय भूमिका घेतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Chhatrapati Sambhajinagar News, Marathwada
Chhatrapati Sambhajinagar News, MarathwadaSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला कायम विरोध दर्शवणाऱ्या राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस पक्षाचा सध्या पुरता गोंधळ उडाला आहे. (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडी सरकारमध्ये घटक पक्ष असलेल्या या दोन्ही पक्षांनी शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या नामांतराच्या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला होता. नामांतराला काॅंग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे हे जेव्हा समोर आले तेव्हा दोन्ही पक्षांनी सावध भूमिका घेतली.

Chhatrapati Sambhajinagar News, Marathwada
Chandrakant Khaire News : नामांतराला विरोध आहे, तर मग न्यायालयात जा, आंदोलनाची नौटंकी कशाला ?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी तर हा निर्णय आम्हाला न विचारता घेतला गेला असे सांगत हात झटकले होते. तर (Congress) काॅंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील नामांतराने लोकांचे प्रश्न सुटतात का? हा काही आमच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले, शिंदे-फडणवीस सरकारने आघाडी सरकारच्या नामांतराच्या निर्णयात सुधारणा करत छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीव या नावाचा ठराव विधीमंडळात मंजुर करून तो केंद्राकडे पाठवला होता.

केंद्राने नुकतेच यावर शिक्कामोर्तब केले आणि या दोन्ही जिल्ह्यांची अधिकृत नावे बदलली गेली. नामांतराचे श्रेय घेण्यावरून ठाकरे गट, शिवसेना, भाजप या पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. पण राष्ट्रवादी व काॅंग्रेस हे पक्ष या मुद्यावरून गोंधळलेले दिसत आहे. राज्य पातळीवरचे नेते यावर भूमिका स्पष्ट करायला तयार नाहीत, तर स्थानिक पातळीवर नेते, पदाधिकाऱ्यांना काय निर्णय घ्यावा हे समजत नाही.

दोन्हीकडील नेत्यांनी चुप्पी साधल्यामुळे या पक्षातील मुस्लिम पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मात्र मोठी गोची होतांना दिसते आहे. महाविकास आघाडी सरकारने आधी नामांतराचा निर्णय घेतला असल्यामुळे आता तो नाकारताही येत नाही आणि त्याचे समर्थनही करता येत नाही अशी कोंडी काॅंग्रेस-राष्ट्रवादीची झाली. त्यामुळे स्थानिक पातळीवर नामांतराच्या विरोधातील रोष व्यक्त करण्यासाठी राजीनामे देण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.

राष्ट्रवादीच्या काही स्थानिक मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी काल आपले राजीनामे दिले. पक्षावर प्रभाव पाडणारी ही नावे नसली तरी याची दखल राष्ट्रवादीला घ्यावी लागेल. एमआयएमकडे वळलेली मुस्लीम वोट बॅंक राज्यात महाविकास आघाडीचा प्रयत्न यशस्वी होत असतांना ती पुन्हा आपल्याकडे वळवण्यात नामांतराचा मुद्दा काॅंग्रेस-राष्ट्रवादीला अडथळा ठरणार आहे. आता पुढील महिन्यापासून होणाऱ्या महाविकास आघाडीच्या संयुक्त सभामधून हे दोन्ही पक्ष नामांतरावर काय भूमिका घेतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com