जालना : काँग्रेस (Congress) पक्षाचे जेष्ठनेते व अंबड चे माजी नगराध्यक्ष भवानीदास (बाबूराव) कुलकर्णी (Baburao Kulkarni) यांचे (वय७८) आज (ता. ३०) रोजी दुपारी ४:४६ वाजता आपल्या घरी दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन भाऊ, तीन बहिणी, दोन मुले, दोन मुली सुना, नातवंडे असा परिवार आहे.
घनसावंगी तालुक्यातील बोडखा बुद्रुक १९ सप्टेंबर १९४४ रोजी जन्मलेल्या व बोडखा बु" येथील मूळ रहिवासी असलेले वडील काँग्रेसचे कै. माजी आमदार भालचंद्रराव कुलकर्णी यांच्या काळात अंबड येथे स्थाईक झाले. वडिलांकडून त्यांना राजकारणच बाळकडू मिळाले. १९७४ ला वयच्या २५ व्या वर्षी ते अंबड पालिकेत काँग्रेस पक्षाचे नगरसेवक म्हणून निवडून आले, व त्याच काळात स्वर्गीय तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांना आणिबाणी नंतर झालेल्या आटकेनंतर त्यांनी ही कारावास भोगला होता.
काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख होती. नगरपालिकेत त्यांचे अधिराज्य जवळ जवळ ३५ वर्ष होते, म्हणूनच अंबड शहर वासीयांनी त्यांना "मालक" ही पदवी बहाल केली होती. १९९१ ते १९९६ ते स्वतः अंबड नगर पालिकेचे नगराध्यक्ष होते, २००१ ते २००६ त्यांच्या पत्नी सुलभाताई कुलकर्णी या नगराध्यक्ष होत्या, ते १९७४ मध्ये पहिल्यांदा नगरसेवक पदावर निवडून आले. आजपर्यंत ते नगरपालिकेचे सदस्य होते, त्यांचा एकदाही पराभव झाला नाही.
कै. शंकरराव चव्हाण यांच्याशी त्यांची जवळीक होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य हे पद ही त्यांनी भूषविले त्यांच्या एकनिष्टेचे फळ म्हणून नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी मिळाली होती. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला, गोरगरीब, सर्वसामान्यांच्या नेत्याच्या निधनाने संपूर्ण शहरावार शोककळा पसरली आहे. उद्या ३१ ऑगस्ट रोजी ११ वाजता त्यांच्या भालगाव रोड वरील शेतात अंतसंस्कार करण्यात येणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.