Ashok Chavan News : वंचितमुळे होरपळलेले अशोक चव्हाण म्हणतात, आंबेडकरांनी महाविकास आघाडीत यावे...

Congress News : महाविकास आघाडीची पुढची सकारात्मक पावले पडण्याच्या दृष्टीने हा एक शुभ संकेत आहे.
Ashok Chavan News
Ashok Chavan NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे २०१९ च्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला होता. (Vanchit Bahujan Aghadi) स्वतः अशोक चव्हाण यांचा नांदेड लोकसभा मतदारसंघात पराभव झाला होता. वंचितच्या यशपाल भिंगे यांनी लाखांवर मते घेतल्याने चव्हाण पराभूत झाले होते. एवढेच नाही, तर त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाणांचे खंदे समर्थक वंचितमुळेच पराभूत झाले होते.

Ashok Chavan News
Supriya Sule criticizes Fadnavis : माफीनाम्याचा ढोंगीपणा बंद करा, काँग्रेस-राष्ट्रवादीने कधीच कंत्राटी पदे भरली नव्हती...

आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांची मुंबईत भेट झाली. या भेटीवर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचितने महाविकास आघाडीत यावे, ही माझी व्यक्तिगत इच्छा असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे. वंचितमुळे होरपळलेल्या अशोक चव्हाण यांनी आपली व्यक्तिगत इच्छा व्यक्त केली असली तरी काँग्रेसला सतत पाण्यात पाहणाऱ्या दिल्लीतील नेत्यांनी ती मान्य होणार का? हा खरा प्रश्न आहे.

भाजपविरोधातील इंडियामध्ये सहभागी होण्यासाठी प्रकाश आंबेडकर प्रयत्नशील आहेत. तशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली होती. शिवाय महाराष्ट्रात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी हातमिळवणी केली आहे. (Ashok Chavan) प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितला महाविकास आघाडीत घ्यावे, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांचीही होती. परंतु शरद पवार आणि काँग्रेसच्या विरोधामुळे हे घडू शकले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पवार आणि आंबेडकरांची मुंबईत भेट झाल्यानंतर आता `वंचित` महाविकास आघाडी आणि देशपातळीवरील `इंडिया` आघाडीचा भाग बनण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काँग्रेसने पवार-आंबेडकर भेटीवर भाष्य केले आहे. आज मुंबईत एका कार्यक्रमानिमित्ताने झालेली प्रकाश आंबेडकर व शरद पवारांची भेट ही अतिशय स्वागतार्ह बाब आहे. महाविकास आघाडीची पुढची सकारात्मक पावले पडण्याच्या दृष्टीने हा एक शुभ संकेत आहेत. माझी व्यक्तिगत इच्छा आहे की प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी आणि महाविकास आघाडीने आगामी निवडणुकीमध्ये एकत्र आले पाहिजे.

आज भलेही एका कार्यक्रमानिमित्ताने किंवा आंबेडकरांच्या भाषेमध्ये कॉफी पिण्याच्या निमित्ताने एकत्र आल्याचे संकेत त्यांनी दिले; जे काही असेल ते सकारात्मक आहे आणि आगामी काळामध्ये यातून एक संवाद सुरू होईल. पुढील काळात वंचित आघाडीला महाविकास आघाडी सोबत घेण्याच्या दृष्टीने काही चांगली सकारात्मक पावले पडावीत, अशी माझी इच्छा असल्याचे सांगत अशोक चव्हाणांनी या भेटीवर समाधान व्यक्त केले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com