MLA Amit Deshmukh : छत्रपतींचा पुतळा कोसळला, अटल सेतू, समृद्धीची तीच गत

Congress MLA Amit Deshmukh said, Maharaj's statue collapsed; Same condition of Atal Setu, Samriddhi Highway : केंद्र आणि राज्य शासनाकडून अलीकडच्या काळात बांधण्यात आलेले अटल सेतू,समृद्धी महामार्ग आणि इतर राष्ट्रीय महामार्ग तसेच अनेक पूल आणि इमारतींची बांधकामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्याचे उघड झालेले आहे.
Amit Deshmukh
Amit Deshmukhsarkarnama
Published on
Updated on

Latur Political News : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला आणि सरकारची सर्वत्र नाचक्की झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्यावर्षी डिसेंबर 2023 मध्ये उभारण्यात आलेला महाराजांचा पुतळा आठ महिन्यात कोसळल्याने त्याचे काम किती निकृष्ट दर्जाचे झाले होते, हे स्पष्ट होते.

या घटनेवरून शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली असतानाच राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडी आणि त्यांच्या नेत्यांनी सत्ताधारी पक्षांवर टीकेची झोड उठवली आहे. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, तीच गत राज्यातील अटल सेतू, समृद्धी महामार्ग आणि विविध राष्ट्रीय महामार्गांची झाली आहे, अशा शब्दात काँग्रेसचे आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला.

किमान छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारतांना तरी विशेष काळजी घ्यायला हवी होती, अशी टीका देशमुख यांनी केली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला पुतळा काही महिन्यातच कोसळला आहे, ही बाब अत्यंत दुर्दैवी असून निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदाराची व इतर सर्व संबंधितांची कसून चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

Amit Deshmukh
Congress Politics: भाजपने भ्रष्टाचारासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनाही सोडले नाही, याची खंत!

केंद्र आणि राज्य शासनाकडून अलीकडच्या काळात बांधण्यात आलेले अटल सेतू,समृद्धी महामार्ग आणि इतर राष्ट्रीय महामार्ग तसेच अनेक पूल आणि इमारतींची बांधकामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्याचे उघड झालेले आहे. (Congress) छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक बांधताना तरी किमान शासनाने आवश्यक ती काळजी घेणे आवश्यक होते, मात्र तेही घडलेले नाही.

हा निष्काळजीपणा मन सुन्न करणारा आहे, या गंभीर प्रकरणाला जबाबदार असलेल्या कंत्राटदारासह इतर सर्व संबंधित घटकांची कसून चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अमित देशमुख यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com